लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी विसोराबर्डी शेतशिवारात धाड टाकून २ लाख २५ हजार रुपये किमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. लॉकडाऊनदरम्यान गस्त सुरू असताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवत ही कारवाई केली.विसोराबर्डी परिसरात मोहाचा सडवा असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने विसोराबर्डी येथे जाऊन तेथील उपसरपंच नाकाडे, पोलीस पाटील सहारे व गावातील व्यक्ती युवराज बघमारे यांच्या मदतीने मोहफुलाच्या सडव्याचा शोध घेतला. त्यामध्ये ७५ पोती मोहफूल सडवा आढळून आला. सदर मोहफुलाचे पोते पाण्यात भिजवून ठेवण्यात आले होते. तो सडवा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक हर्षल नगरकर, पोलीस शिपाई राकेश देवेवार, संतोष नागरे, अल्का तांदुळकर, राजेश शेंडे यांनी केली.
गडचिरोलीत सव्वादोन लाखांचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:58 IST
देसाईगंज पोलिसांनी विसोराबर्डी शेतशिवारात धाड टाकून २ लाख २५ हजार रुपये किमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. लॉकडाऊनदरम्यान गस्त सुरू असताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवत ही कारवाई केली.
गडचिरोलीत सव्वादोन लाखांचा सडवा नष्ट
ठळक मुद्देविसोराबर्डीत कारवाईदेसाईगंज पोलिसांचा पुढाकार