शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महेश राऊत व गडलिंग यांची अटक हे राजकीय षड्यंत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:39 IST

जे लोक सरकारच्या धोरणाविरूद्ध आवाज उठवितात त्यांचा आवाज पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.

ठळक मुद्देखोट्या केसेस मागे घ्या : डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जे लोक सरकारच्या धोरणाविरूद्ध आवाज उठवितात त्यांचा आवाज पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात कुठलाही संबंध नसताना सामाजिक कार्यकर्ते महेश राऊत किंवा वंचितांसाठी लढणारे अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांना अटक करणे हे राजकीय षड्यंत्रच आहे, असा आरोप भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.महेश कोपुलवार आणि जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नोगोटी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रपरिषदेत केला.गडचिरोलीत बुधवारी घेतलेल्या पत्रपरिषदेला महेश राऊतची आई व बहिण तसेच भामरागड, एटापल्ली, अहेरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना डॉ.कोपुलवार म्हणाले, आम्ही डाव्या विचारसरणीचे आहोत, आम्हीही लाल झेंडेवाले आहोत. पण आमच्यात आणि नक्षलवाद्यांमध्ये फरक आहे. आम्ही नक्षल समर्थक नाही. आम्ही संसदीय मार्गाने लढत आहोत. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी महेश राऊत काम करीत होते. पंतप्रधान ग्रामीण विकास मित्र म्हणूनही त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत काम केले आहे.पेसा व वन कायद्याचे ते अभ्यासक आहेत. नक्षलवाद्यांचा निवडणूक प्रक्रियेला विरोध असताना लोकांना निवडणुकीचे महत्व पटवून देऊन ग्रामसभांचे उमेदवार निवडणुकीत उभे करण्यात राऊत यांचा सक्रिय पुढाकार होता. जी व्यक्ती लोकशाहीला वाचविण्यासाठी सहकार्य करते ती नक्षल समर्थक होऊ शकते का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. याशिवाय नागपूरचे वकिल अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग हे पोलिसांनी नक्षल समर्थक म्हणून खोटे गुन्हे दाखल केलेल्या गरीब आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांची न्यायालयात बाजू मांडणारे वकिल म्हणून परिचित आहेत. त्यांचाही या प्रकरणाशी संबंध नसताना तो जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी ते म्हणाले.पेसा कायद्यामुळे ग्रामसभांचा अधिकार असणाºया जिल्ह्यातील गौणखनिजाच्या अनेक खाणी ग्रामसभांना डावलून उद्योजकांना देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. पण महेश राऊतमुळे लोकांमध्ये त्याबाबत जागृती येऊन ग्रामसभांकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे सत्तेचे वाटेकरी असणाºया लोकांनी हा आवाज दडपून टाकण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप पदाधिकाºयांनी या पत्रपरिषदेत केला. एवढेच नाही तर पोलिसांनी घडविलेल्या चकमकीत काही निरपराध आदिवासींना मारल्याच्या सत्यशोधन समितीच्या अहवालात काही पुरावे राऊत देणार होते म्हणून त्यांना पोलिसांनी अडकविल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राऊत व गडलिंग यांचा कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध नसताना त्यांच्यावर लावलेले आरोप मागे घ्यावे, अन्यथा कायदेशिर मार्गाने आणि रस्त्यावर उतरून लढा देऊ अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.पत्रपरिषदेला भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी, भाकपचे जिल्हा सचिव तथा माजी जि.प.सदस्य अमोल मारकवार, राऊत यांची आई स्मीता सीताराम राऊत, बहिण सोनाली राऊत, ग्रामसभा सदस्य हरिदास पदा, भारिप-बमसंच्या माला भजगवळी, चंद्रभान मेश्राम, प्रकाश खोब्रागडे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.एल्गार परिषदेत सहभागच नव्हता?कोरेगाव भीमातील हिंसाचारापूर्वी झालेल्या ज्या एल्गार परिषदेतील सहभागासाठी महेश राऊत आणि अ‍ॅड.गडलिंग यांना अटक झाली त्या एल्गार परिषदेत हे दोघेही सहभागीच नव्हते अशी माहिती या पत्रपरिषदेत देण्यात आली. त्यावेळी राऊत हे नागपुरात तर अ‍ॅड.गडलिंग हे दिल्लीत होते. असे असताना त्यांचा संबंध त्या प्रकरणाशी जोडल्याचे ते म्हणाले.