शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना, १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ४७ कोटी, सणाचा आनंद द्विगुणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:42 IST

कर्ज भरणाऱ्यांना दिलासा : आधार प्रमाणीकरण नसल्याने ११२ जण अद्याप वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले अशा १४ हजार ८४१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४७ कोटी ३० लाख रुपये एवढी रक्कम शासनाने जमा केली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता मिळाला आहे.

जिल्ह्यातील १२३ शेतकऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात ४८ लाख रुपये जमा करण्यात आले. या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी ग जिल्ह्यातील ११२ शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण केले नाही. अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सुविधा केंद्र अथवा आपल्या बँक शाखेत आपले आधार प्रमाणिकीकरण करुन घ्यावे असे आवाहन शासनाने केले आहे. 

या योजनेमध्ये सन २०१७-२०१, २०१८-२०१९, २०१९-२०२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे अशा एकूण १४ हजार ८४१ हजार शेतकऱ्यांना आज पर्यंत एकूण ४७.३० कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे. दरम्यान, नियमित कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत लाभ भेटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

५० हजार रुपयांची मर्यादा प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आले आहे.

यांना मिळणार नाही योजनेचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून), राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी