शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

Maharashtra Election 2019 ; कोणते डॉक्टर पकडणार मतदारांची नाडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. भाजपची बुथनिहाय कार्यकर्त्यांची रचना, जातीच्या उमेदवाराला मतदान करण्याची मतदारांची मानसिकता, चामोर्शी तालुक्यातील बंगाली व्होटबँक या जमेच्या बाजुमुळे ते भक्कम स्थितीत आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली विधानसभा निवडणुकीत दोन डॉक्टरांमधील लढत आता निर्णायक टप्प्यात आली आहे. भाजपचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी आणि काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते यांच्यात थेट लढत असली तरी महाआघाडीतील शेतकरी कामगार पक्षाने या मतदार संघात उमेदवारी कायम ठेवून उमेदवारांच्या अडचणीत वाढ केली आहे. अशा स्थितीत मुख्य लढतीमधील दोन्ही डॉक्टरांपैकी कोण मतदारांची ‘नाडी’ पकडण्यात यशस्वी होतो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.परिस्थिती फारशी अनुकूल नसताना विद्यमान आमदार डॉ.होळी यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करत पुन्हा भाजपचे तिकीट पटकावण्यात यश मिळवले. पण तत्पूर्वीच त्यांनी जनसंपर्क आणि गावागावात छोट्यामोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पार्श्वभूमी तयार केली होती. भाजपची बुथनिहाय कार्यकर्त्यांची रचना, जातीच्या उमेदवाराला मतदान करण्याची मतदारांची मानसिकता, चामोर्शी तालुक्यातील बंगाली व्होटबँक या जमेच्या बाजुमुळे ते भक्कम स्थितीत आले आहे. सोबतच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटदार आणि त्यांची फळी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघात जनसंपर्क ठेवून युतीधर्म निभावताना दिसत आहे. खासदार नेते यांनीही प्रचाराला लागून आपले मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे दाखविले.दुसरीकडे काँग्रेसने मोठ्या अपेक्षेने डॉ.चंदा कोडवते या फ्रेश महिला उमेदवाराला निवडणुकीत उतरवले. गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच कोडवते दाम्पत्याची निवडणूक लढण्याची तयारी पाहता त्यांची राजकारणातील एन्ट्री हंगामा करेल, असे चित्र रंगवले जात होते. मात्र प्रत्यक्षात अनेक कार्यकर्त्यांचा आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला. प्रत्येक गोष्टीचा बारीक ‘हिशेब’ देण्याची सवय नसणारे कार्यकर्ते दुरावल्या गेले. गावात आपल्या पक्षाचा कोण पदाधिकारी-कार्यकर्ता आहे याचीही माहिती नसल्याने ‘आम्हाला मानच दिला जात नाही’ म्हणून ते नाराज झाले. निवडणूक काय असते याचा अनुभव नसणाºया या डॉक्टर दाम्पत्याची त्यात चूक नसली तरी ज्येष्ठ मार्गदर्शकांनी दिलेल्या सूचनांचेही पालन करताना त्यांनी ‘हात’ आखडता घेतला. त्यामुळे त्यांच्या हाताला मतदार सढळ हाताने मतदान करतात की, तेसुद्धा आपला हात आखडता घेतात याची चर्चा सुरू आहे.भाजप-काँग्रेसच्या या थेट लढतीत शेकाप, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काही मते घेतील. शेकापच्या जयश्री वेळदा यांनी पक्षाची ताकद नसताना २०१४ ची निवडणूक लढली होती. पण यावेळी ग्रामीण भागात बºयापैकी नेटवर्क तयार करून शेकापने पुन्हा निवडणुकीत उडी घेतल्याने ते कोणाचे गणित बिघडवणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली