शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Maharashtra Election 2019 : दारुमुक्त निवडणुकीसाठी गावे एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील मुक्तिपथ संघटनांनी दारूबंदी टिकवून ठेवली आहे. पण मतदान प्रचारादरम्यान गावात दारूचा शिरकाव होऊ शकतो.

ठळक मुद्देमद्यपी उमेदवार नको : एटापल्ली तालुक्यातील ४७ गावांनी घेतला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यातील अनेक गावे एकवटली आहे. आतापर्यंत तब्बल ४७ गावांनी ग्रामसभेत व गावसभेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव घेतला आहे. गावागावात रॅली काढून जनजागृती केली जात आहे.निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील मुक्तिपथ संघटनांनी दारूबंदी टिकवून ठेवली आहे. पण मतदान प्रचारादरम्यान गावात दारूचा शिरकाव होऊ शकतो. दारूचे आमिष दाखवून मतदारांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकारही घडू शकतो. असे होऊन गावातील दारूबंदी फोल ठरू नये म्हणून आतापर्यंत तालुक्यातील ४७ गावांनी दारूमुक्त निवडणुकीचा ििनवडणूक दारुमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला रॅली काढून जनजागृती करीत आहेत. तोडसा, आलेंगा, जीवनगट्टा, चंदनवेली यासह इतरही दुर्गम गावांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली.‘जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशा घोषणांनी गावे दणाणली आहेत. जर व्हायचे असेल आमदार तर दारूबंदीला पाठिंबा द्यावाच लागेल, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, मतदान जरूर करा पण शुद्धीत करा, असा संदेश रॅलीतून दिले जात आहेत.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावात दारू वाटप होऊ देणार नाही तसेच मतदान दारूच्या नशेत करणार नाही, असे ठराव सभेत पारित केले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील तोडसा, पेठा, कारमपल्ली, आलेंगा, डोड्डी एकरा, झारेवाडा, गेदा, चंदनवेली, तांबडा, एकनसूर, ताडपल्ली, बारसेवडा, लांझी, गुरुपल्ली, जावेळी, डुम्मे, पंदेवाही, करेम, तुमरगुंडा, उडेरा, आलदंडी, परसलगोंदी, पुरसलगोंदी, सुरजागड, मंगेर, हेडरी, येमली, बिड्री, फुंडी, हालेवारा, घोटसूर, मुसरमगुडा, पेदुलवाही, जारावंडी, कांदळी, सेवारी, चोखेवाडा, जांभिया आदी गावांनी निवडणूक दारुमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. गावात प्रचारादरम्यान येणाºया दारुवर लक्ष ठेवून असल्याचेही गावकऱ्यांनी संगितले.महिलांकडून दारूबंदीबाबत जनजागृतीनिवडणूक दारुमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिला रॅली काढून जनजागृती करीत आहेत. तोडसा, आलेंगा, जीवनगट्टा, चंदनवेली यासह इतरही दुर्गम गावांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ‘जो पाजेल माज्या नवºयाला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ अशा घोषणांनी गावे दणाणली आहेत. जर व्हायचे असेल आमदार तर दारूबंदीला पाठिंबा द्यावाच लागेल, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको, दोन पैशाची दारू घेऊन आपले अमूल्य मत वाया घालवू नका, मतदान जरूर करा पण शुद्धीत करा, असा संदेश रॅलीरून दिला जात आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली