शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Maharashtra Election 2019 ; हवाई सफरीने कर्मचारी बेस कॅम्पवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य पोलीस दलातील कर्मचाºयांसह केंद्र सरकारच्या अखत्यारितील अनेक दलांना जिल्हाभरात तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एसआरपीएफ आणि होमगार्डचे जवानही आले आहेत. जिल्ह्यातील विशेष सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आणि मतदान यंत्रांना (ईव्हीएम) नेण्यासाठी तीन हेलिकॉप्टर तैनात आहेत. याशिवाय ड्रोन कॅमेरांची नजर राहणार आहे.

ठळक मुद्देतीन हेलिकॉप्टर दिमतीला : आज विविध वाहनांनी पोलिसांच्या सुरक्षेत होणार रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेली निवडणूक प्रचाराची धावपळ शनिवारी दुपारी ३ वाजता थांबणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग थंडावणार असली तरी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. संवेदनशिल आणि अतिसंवेदन मतदान केंद्रावर ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पवर नेण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करत कर्मचाऱ्यांना गडचिरोली आणि देसाईगंज येथून रवाना करण्यात आले.मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य पोलीस दलातील कर्मचाºयांसह केंद्र सरकारच्या अखत्यारितील अनेक दलांना जिल्हाभरात तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एसआरपीएफ आणि होमगार्डचे जवानही आले आहेत.जिल्ह्यातील विशेष सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आणि मतदान यंत्रांना (ईव्हीएम) नेण्यासाठी तीन हेलिकॉप्टर तैनात आहेत. याशिवाय ड्रोन कॅमेरांची नजर राहणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना नेताना मोठी जोखीम पत्करावी लागते. बेस कॅम्पवरून दुर्गम भागातील केंद्रावर जाताना पोलीस व मतदान अधिकारी पायदळच जातात. सोबत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे ओझे न्यावे लागते. हे सर्व करताना तारेवरची कसरत करावी लागते. मतदान केंद्राची तपासणी तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना निवडणूक विभागाकडून दिल्या जात आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३४६ मतदान केंद्र राहणार आहेत. चामोर्शी तालुक्यात १६३, गडचिरोली १३१ तर धानोरा तालुक्यात ५२ मतदान केंद्र राहणार आहेत.केंद्रीय गृहमंत्री प्रथमच नक्षलग्रस्त भागातकेंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह यांची नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सभा एका दृष्टीने ऐतिहासिक ठरली. नक्षलदृष्ट्या संवेदनशील भागात पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी सभा घेतली. त्यामुळे ही सभा पूर्ण होईपर्यंत पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण जाणवत होता. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.आलापल्ली येथे असलेल्या पोलीस उपमुख्यालयात एक कायमस्वरूपी हेलिपॅड आहे. मात्र शाह यांच्या सभेसाठी अतिरिक्त दोन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. आलापल्लीसह बाहेरही जिकडेतिकडे सशस्त्र जवान तैनात केले होते. संपूर्ण परिसराची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. प्रत्येक वाहनांचीही कसून तपासणी केली जात होती.अमित शाहंच्या सभेने फरक पडणार?भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने चाणाक्ष खेळी करत अनेकांची दांडी उडविणारे धुरंधर नेते म्हणून अमित शाह यांची ओळख आहे. जिल्हा मुख्यालय असलेले गडचिरोली किंवा चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज अशा कोणत्याही शहरात मोठ्या नेत्याची एकही सभा झाली नसताना अहेरीसारख्या नक्षलग्रस्त भागात प्रचारसभा घेण्यास शाह यांनी प्राधान्य दिले. याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. एकतर गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघ सुरक्षित टप्प्यात आल्यामुळे त्या मतदार संघात प्रचारसभा घेण्याची गरजच नाही, असे भाजपला वाटत असावे. दुसरीकडे नक्षलग्रस्त भागात जाऊन सभा घेऊन आम्ही नक्षलवाद्यांना घाबरत नाही, असा संदेश त्यांनी दिला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.प्रचारसभेच्या वेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अहेरी तालुक्यात भाजपने बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येत आहे.शाहंच्या या सभेने विधानसभा निवडणुकीचे वातावरण बदलेल का, हा चर्चेचा विषय झाला आहे.केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली