शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : निवडणुकीसाठी जुंपणार ४११ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

४११ वाहने बुक केली असून त्यातील काही वाहने वापरण्यास सुरूवातही झाली आहे. बुक केलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ५८ बसगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमातून आतापर्यंत ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर आणि पोर्टलवर ३६४ तक्रारी व चौकशा झाल्या आहेत. त्या सर्व निकाली काढल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठळक मुद्देआतापर्यंत ३६४ तक्रारी निकाली : महामंडळाच्या ५८ बसगाड्यांसह ३९ खासगी बसेसचे बुकिंग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानाची तारीख जवळ येत असताना जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये प्रशासकीय यंत्रणेची लगबग वाढली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने शासकीय आणि खासगी मिळून ४११ वाहने बुक केली असून त्यातील काही वाहने वापरण्यास सुरूवातही झाली आहे. बुक केलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ५८ बसगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमातून आतापर्यंत ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर आणि पोर्टलवर ३६४ तक्रारी व चौकशा झाल्या आहेत. त्या सर्व निकाली काढल्याची माहिती प्रशासनाने दिली.विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. मतदान केंद्रांवरील नियुक्त कर्मचारी व प्रशासकीय साहित्याच्या वाहतुकीसाठी निवडणूक प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाकडे ५८ बसगाड्यांची मागणी नोंदविली आहे. सदर निवडणुकीला शासकीय व खासगी अशी एकूण ४११ वाहने लागणार आहेत. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध पथकांनाही वाहने पुरविण्यात आली आल्हेत. एकूण १३८ शासकीय वाहने निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आली आहेत. यामध्ये १२७ जीप, सुमो, ४ ट्रक, ३ अग्निशमन बंब आणि ४ पाणी टँकर आदी वाहनांचा समावेश आहे. ३७३ खासगी वाहने निवडणुकीच्या कामासाठी लागणार असून यामध्ये महामंडळाच्या बसगाड्या, खासगी बसगाड्या व इतर वाहनांचा समावेश आहे. जीप प्रकारातील १७६ वाहनांचा समावेश आहे. ५८ एसटी बसगाड्या व ३९ खासगी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून मतदान केंद्र, ईव्हीएम संच आदीसह इतर सर्व बाबींचे नियोजन झाले आहे.आतापर्यंत प्राप्त ३६४ तक्रारींपैकी ३३६ तक्रारी कॉल सेंटरवर तर २८ एनजीआरएस या निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आलेल्या आहेत. याशिवाय २ तक्रारी सी-व्हीजील अ‍ॅपवर आलेल्या आहेत.असे लागणार ईव्हीएम साहित्यगडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीनही विधानसभा मतदार संघांसाठी ईव्हीएम मशीन संचाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरात बीयू (बॅलेट युनिट) १ हजार ६९१, सीयू (कंट्रोल युनिट) १ हजार २६४ तसेच १ हजार ३५२ व्हीव्हीपॅटची व्यवस्था केली जात आहे. प्रात्यक्षिक करून दाखविण्यासाठी ५७ संच ठेवण्यात आले आहेत. गडचिरोली मतदार संघात सर्वात जास्त बॅलेट युनिट मशीन लागणार आहेत. कारण एका बुथावर दोन बॅलेट युनिट राहणार आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार गडचिरोली मतदार संघासाठी ८८२ बॅलेट युनिट लागणार आहेत. आरमोरीसाठी ३९२ व अहेरी मतदार संघासाठी ४१७ बॅलेट युनिटची गरज आहे. तीनही मतदार संघात राखीव ईव्हीएम संच ठेवण्यात येणार आहेत.४६६४ अधिकारी-कर्मचारी गुंतणारनिवडणुकीच्या कामात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आणि नंतर मतमोजणीच्या कामासाठी वेगवेगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी राहणार आहे. एकूण ४६६४ अधिकारी व कर्मचारी या कामात गुंतणार असून त्यांचे विविध पातळीवर प्रशिक्षण सत्र सुरू आहे. सूक्ष्म निरीक्षक, मत केंद्रावरील चमू, मतमोजणी केंद्रावरील चमू असे वर्गीकरण करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी शेवटचे प्रशिक्षण २३ आॅक्टोबरला होणार आहे.मतदारांना घरपोच मिळणार व्होटर स्लिपजिल्हाभरात ७ लाख ७६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांचे नाव मतदार यादीत आहे याची खात्री होण्यासोबतच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नाव शोधण्यास मदत व्हावी म्हणून सर्व मतदारांना त्यांच्या व्होटर स्लिप घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. हे काम सुरू झाले असून १६ ऑक्टोबरपर्यंत सर्वांना स्लिप मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली