शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांच्या प्रभावी अभियानाने माेडले नक्षलवादाचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय प्राणहिता येेथे भेट देऊन नक्षलविराेधी अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून वेगवर्धीत पदाेन्नती मिळविलेल्या चार पाेलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गाैरव करण्यात आला. 

ठळक मुद्देराज्याच्या पाेलीस महासंचालकांचे प्रतिपादन

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली पाेलीस दलामार्फत प्रभावी माेहीम राबविल्याने मागील ३० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नक्षल चळवळीचे कंबरडे माेडले आहे. हे पाेलीस दलाचे फार माेठे यश आहे, असे गाैरवाेद्गार राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. पाेलीस महासंचालक यांनी २६ व २७ फेब्रुवारी राेजी गडचिराेली जिल्ह्यातील विविध पाेलीस स्टेशनला भेट दिली. तसेच विविध शाखांमध्ये चालणाऱ्या नक्षलविराेधी कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय प्राणहिता येेथे भेट देऊन नक्षलविराेधी अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून वेगवर्धीत पदाेन्नती मिळविलेल्या चार पाेलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गाैरव करण्यात आला. यावेळी महासंचालकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सेवेत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविल्या जातील, असे आश्वासन दिले. धानाेरा तालुक्यातील सावरगाव पाेलीस मदत केंद्रालाही पाेलीस महासंचालकांनी भेट देऊन जवानांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गडचिराेली परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, विशेष कृती दलाचे नीलम राेहण, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, साेमय मुंडे उपस्थित हाेते.

जिमलगट्टातील जवानांच्या समस्या जाणल्याजिमलगट्टा: राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी  छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील देचलीपेठा  पोलीस स्टेशनला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी जवानांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासाेबत गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सोमय मुंडे ,जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. बांधकामाचे भूमिपूजन महासंचालकांच्या हस्ते करण्यात आले.  देचलीपेठा पोलीस ठाण्याला भेट देणारे ते पहिले पोलीस महासंचालक आहेत. बहुतांश पाेलीस जवानांचे कुटुंब साेबत नाही. कुटुंबीयांसाेबत बाेलण्यासाठी या भागात मोबाईलचे कव्हरेज उपलब्ध नाही. तसेच  पिण्याच्या पाण्याची समस्या यासह काही समस्या कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडल्या. या सगळ्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्याचे आश्वासन पोलीस महासंचालक यांनी दिले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस