शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:51 IST

दिल्लीच्या 'मॉडेल'च्या आयुष्याची चित्तरकथा : ब्रह्मपुरीचा आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इंस्टाग्रामवर मैत्री करत आरोपीने एका परप्रांतीय मॉडेल तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून देसाईगंजमध्ये आणले. लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलले. ९ जून रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला. यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीचे नाव मंजीत रामचंद्र लोणारे (४४, रा. गजानननगरी, ब्रह्मपुरी, जि. चंदपूर) आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय महिला दिल्लीतील उत्तर-पूर्व परिसरातील आहे. सन २०१७मध्ये पीडितेचा विवाह झाला होता. तिला ६ व २ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ३ मार्च २०२४ रोजी पतीने घटस्फोट घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन मुलांसह ती आई वडिलांजवळ राहात होती. मॉडेलिंगची आवड असलेल्या या महिलेची इन्स्टाग्रामवरून २४ ऑगस्ट २०२४ रोजी मंजीत लोणारे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संवाद सुरू झाला. मॉडेलिंगच्या कामासाठी ती २७ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरला आली. यावेळी मंजीतने तिला ब्रह्मपुरीला कुटुंबासोबत भेटण्यासाठी म्हणून बोलावले. दोन दिवस ती त्याच्या घरी राहिली. त्यानंतर ती दिल्लीला परतली. २८ मे रोजी देसाईगंज ठाण्यात गुन्हा नोंद झाला, पीडिता दोन महिन्यांची गर्भवती आहे.

प्रेम, लग्नाचे आमिष अन् धोकामंजीत लोणारे याने पीडितेला आपले तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगून जाळ्यात ओढले. त्यानंतर आपल्या पत्नीशी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करेन, नवे घर घेऊ व एकत्रित राहू, असे वचनही दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ती दिल्लीहून ब्रह्मपुरीत आली. मंजीत लोणारे तिला घेऊन तीन दिवस देसाईगंजच्या हॉटेल आर. आर. मध्ये राहिला. यादरम्यान त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला. 

इमोशनल ब्लॅकमेलिंग अन् ढकलले देहव्यापारात

  • घर घेण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आत्महत्या करावी लागेल, असे सांगून मंजीत लोणारे याने तिला वेश्याव्यवसायात ढकलले.
  • १८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने देसाईगंजात लाखांदूर रोडवर एका सावजी हॉटेलला चिकटून किरायाने खोली केली, तेथे तिला वेश्याव्यवसायासाठी मजबूर केले.
  • नंतर देसाईगंजातील आर. आर. हॉटेल, कुरखेडातील महामाया हॉटेलातही वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला व मारहाण करण्यास सुरुवात केली.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीProstitutionवेश्याव्यवसाय