शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

मुतनूर यात्रेत लोटला जनसागर

By admin | Updated: April 11, 2016 01:42 IST

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ३७ किमी अंतरावरील अतिदुर्गम मुतनूर येथे आदिवासींच्या अम्बोजम्बो देवस्थानात गुढीपाडव्यानिमित्त ...

गुढीपाडव्याचे औचित्य : आदिवासींचे श्रद्धास्थान अम्बोजम्बो देवस्थानात घेतले दर्शनतळोधी (मो.) चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ३७ किमी अंतरावरील अतिदुर्गम मुतनूर येथे आदिवासींच्या अम्बोजम्बो देवस्थानात गुढीपाडव्यानिमित्त भरलेल्या यात्रेत हजारो भाविकांची गर्दी उसळली. यात्रेत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थानात भाविकांची मांदियाळी होती. गुढीपाडव्यानिमित्त मुतनूर पहाडीवर आयोजित यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची अधिक गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी पहाडीवर दाखल झाले. दरवर्षी यात्रास्थळी दुकाने लावली जात नव्हती. मात्र यंदा अनेकांनी दुकाने थाटली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री बाहेरील २० चमूंनी सांस्कृतिक व भक्तीगीतांचे कार्यक्रम सादर केले. यात्रेत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी मुतनूर ग्रामस्थांच्या वतीने ग्राम भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. (वार्ताहर)२० वर्षांपासून यात्रेची परंपरा कायमपावीमुरांडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निकोसे यांनी २० वर्षांपूर्वी मुतनूर पहाडीवर यात्रा भरविण्याची परंपरा सुरू केली. डॉ. निकोसे यांना साक्षात्कार झाला. त्यामुळेच यात्रेची परंपरा सुरू करण्यात आली, असा नागरिकांमध्ये समज आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षांपूर्वी यात्रेत भाविकांची फारसी गर्दी उसळत नव्हती. परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मुतनूर देवस्थानाला जिल्ह्यातील दुर्लक्षित देवस्थानाच्या यादीत समाविष्ट केल्याने ग्रामपंचायत पावीमुरांडाकडून ठराव घेऊन देवस्थान स्थळाचा विकास करण्याचे ठरविण्यात आले. त्वरित दोन टप्प्यात १५ लाख प्रमाणे ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तत्कालीन सरपंच रवींद्र कुळमेथे यांच्या कार्यकाळात पहिल्या टप्प्यात देवस्थानाच्या विकासासाठी प्रवेशद्वार, माता मंदिर बांधकाम, अर्ध्या अंतरावरील पायऱ्या तयार करण्यात आल्या. तसेच काही भाविकांनी पूर्वनियोजित जागेत आदिशक्ती, भगवान शंकर, दुर्गा मंदिर व मूर्तींची स्थापना स्व:खर्चातून केली. त्यामुळे मुतनूर देवस्थानाचा विकास होण्यास मदत होत आहे.