शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

Lok Sabha Election 2019; चामोर्शी तालुक्याचा कौल कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:06 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक मतदारांचा तालुका : आंबेडकरांच्या सभेनंतर वाढणार रंगत

रत्नाकर बोमीडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. अहेरी व आरमोरी या दोन्ही विधानसभा मतदार संघाला जोडणारा तालुका असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर चामोर्शी तालुक्यातील मतदारांवर असतो.निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठी चढाओढ सुरू होती त्याचेही केंद्र चामोर्शी तालुक्यातच होते. अखेरीस काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात याच तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले डॉ.नामदेव उसेंडी यशस्वी झाले. त्यामुळे विद्यमान खासदार नेते आणि डॉ.उसेंडी अशी सरळ लढत असली तरी गेल्यावेळी याच दोघांच्या फाईमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेले डॉ.रमेशकुमार गजबे यांनी ५० हजारावर मते घेतली होती. यावेळी पुन्हा ते वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत.दोन्ही प्रमुख पक्षातील गटबाजी केव्हा, कशी उफाळून येईल, हे सांगता येत नाही. भाजपाच्या प्रचारासाठी केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्टÑाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चामोर्शीत येत आहेत. त्यांच्या सभेनंतर भाजप-काँग्रेस उमेदवारांची स्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होईल. परंतु मागील निवडणुकीत तिसºया स्थानी राहिलेले चिमूरचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांना रिंगणात उतरविणारे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर २ एप्रिल रोजी चामोर्शी येथे सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेनंतर निवडणुकीचा माहोल कसा बदलतो याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. वंचित व बहुजनांना सोबत घेण्यात ते यशस्वी झाले तर दुहेरी होत असलेली निवडणूक या तालुक्यात तरी तिहेरी झाल्याशिवाय राहणार नाही.११ जि.प. क्षेत्र व एक नगर पंचायत असलेला चामोर्शी तालुका भाजपामय झाला असला तरी कार्यकर्त्यांच्या विभाजनामुळे पोखरला गेला आहे. त्याचा फायदा काँग्रेस कसा घेते यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये अंतस्त गटबाजी आहे, याची चुणूक न.पं. निवडणुकीत दिसून आली. तसेच उमेदवारी मिळवितानाही डॉ. नामदेव उसेंडींना त्रास गेलाच. दोन्ही पक्षातील गटबाजीचा लाभ घेऊन वंचित बहुजनांना एकत्रित करण्यात डॉ.गजबे यशस्वी झाले आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची जादूची झप्पी लागू पडली तर डॉ.गजबे देखील रणांगणात येऊन तिरंगी लढतीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेस ते भाजप प्रवासचामोर्शी तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राजकारणात शिवसेनेच्या प्रवेशानंतर शिवसेनेने आपला दबदबा निर्माण केला. नंतर अशोक नेते यांच्या राजकीय प्रवेशानंतर हा तालुका भाजपाच्या ताब्यात केव्हा व कसा गेला हे कोणालाच कळले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक