शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:52 IST

भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे.

ठळक मुद्देलाहेरीत शिक्षक देण्याची मागणी : सात वर्गासाठी केवळ दोनच वर्गखोल्या

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने शिक्षक व वर्गखोल्यांची व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी लाहेरी जि.प. शाळेला शुक्रवारी कुलूप ठोकले.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने २७ जून २०१८ रोजी भामरागडच्या बीडीओंना लेखी निवेदन देऊन शिक्षक देण्याची मागणी करण्यात आली होती. वर्गखोल्यांची व्यवस्था करावी, धूळखात पडलेल्या संगणक संचाची दुरूस्ती करावी, डिजिटल शाळेसाठी पुरविण्यात आलेल्या एलईडी टीव्हीचा वापर करण्यात यावा, मागील सात वर्षांपासून रिक्त असलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागण्या मंजूर न झाल्याने शाळा समितीचे सभापती सुरेश सिडाम यांच्या नेतृत्वात लाहेरी शाळेला कुलूप ठोकण्यात आले.शाळेच्या समस्यांना घेऊन कुलूप ठोकण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना ४ जुलैला निवेदन दिले होते. ५ जुलैपर्यंत प्रशासनाने शिक्षक व शाळेच्या इतर मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा ६ जुलैला कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनातून दिला होता. आंदोलनाच्या वेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली