लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे यावेळी वाचली जाऊन त्यावर आक्षेप मागविले जाणार असल्यामुळे गावागावात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. यातूनच कर्जमाफीत आणखी अडथळे निर्माण होणार आहेत.थकित कर्जावर दीड लाखांची कर्जमाफी शासनाने जाहीर केली. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात निकष लावण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता करू शकणाºया शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरायचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ हजार ८२७ शेतकºयांनी अर्ज भरले. त्या शेतकºयांची माहिती सीएससी या एजन्सीमार्फत आपले सरकार या पोर्टलवर टाकण्यात आली. मात्र याचवेळी बँकांकडूनही संभावित पात्र शेतकºयांची यादी ६६ कॉलममध्ये भरून मागविली.विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी माहितीसोबत आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड जोडलेली नाहीत. त्यांच्याकडून ती कागदपत्रे पुन्हा मागवून त्यांचे नाव यादीत टाकले जात आहे. यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी आणि बँकांनी दिलेली शेतकºयांची यादी ग्रामपंचायतींमध्ये लावली जाईल. जाणार आहे. या यादीमधील कोणते शेतकरी शासनाच्या निकषात बसणार नाहीत हे गावकºयांनीच ठरवून संबंधित पात्र शेतकºयांची यादी जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची आहे.ग्रामपंचायतींमध्ये लागणाºया याद्यांमधील निकषात न बसणाºया अनेक जणांच्या नावांवर गावागावांतून आक्षेप येऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकºयांची नावे वगळली जातील त्यांच्यात मोठा असंतोष पसरण्याची शक्यता आहे.चावडी वाचनासाठी केवळ चार दिवसचावडी वाचनासाठी २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असे केवळ चार दिवस देण्यात आले आहेत. या ४ पैकी ३ दिवस सुटीचे आणि दसºयाच्या सणाचे आहेत. अशावेळी या चावडीवाचनाचे काम या चार दिवसात पूर्ण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चावडी वाचनासाठी मुदत वाढवून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही.शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणारचावडी वाचनात वगळलेल्या नावानंतर तयार झालेली यादी जिल्हाधिकाºयांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्यावर पुन्हा येणाºया आक्षेपांवर विचार करून अंतिम पात्र शेतकºयांची यादी तयार करून शासनाने पाठवतील. त्यानंतर शासनाकडून पात्र शेतकºयांची यादी जाहीर होईल. याशिवाय आधीच कर्ज भरलेल्या शेतकºयांच्या खात्यात त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होईल.
चावडी वाचनामुळे कर्जमाफीत अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:33 IST
राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे ...
चावडी वाचनामुळे कर्जमाफीत अडथळे
ठळक मुद्देअनेकांची नावे गळणार : सात हजारांवर शेतकरी वंचित