शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रोवलेल्या धानाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:31 IST

१५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.

ठळक मुद्देशुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी : पुरेशा पाण्याअभावी मात्र रोवणीची कामे खोळंबलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अगदी वेळेवर व समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने जवळपास १५ ते २० दिवस उसंत घेतली. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी आटले. त्यामुळे रोवणीची कामे बंद पडली. त्याचबरोबर रोवलेल्या धानाच्या बांधितही पाण्याअभावी फटी पडू लागल्या व धानाचे पीक करपायला लागले होते. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. यावर्षी सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा शक्यता वर्तविली जात होती. मात्र शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दिवसभर पाऊस पडत होता. या पावसामुळे करपणाºया धान पिकाला दिलासा मिळाला आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनपर्यंत खोळंबलेली रोवणीची कामे मात्र सुरू झाली नाही. रोवणी पुन्हा सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. धान पिकाची रोवणी जेवढी उशीरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजुनही जवळपास ३० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.४० हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविनापावसाने उसंत घेतल्याने जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर अजुनही धान पिकाची रोवणी झाली नाही. हे शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची रिपझीप सुरू होती. मात्र अशा पावसामुळे धानाच्या बांधीत रोवण्यायोग्य पाणी साचत नाही. रोवणे सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. धानाचे पºहे टाकल्याला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. उशीरा रोवणी झाल्याने उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती