शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एमआरईजीएसच्या कामावर आढळला जिवंत बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:05 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) सुरू असलेल्या नाला सफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपल्यात मातीसोबत जीवंत हॅन्डग्रेनेड आल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली तरी त्या ठिकाणी ते हॅन्डग्रेनेड आले कसे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देशंका कुशंकांना पेव : घातपात घडविण्याचा डाव?

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) सुरू असलेल्या नाला सफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपल्यात मातीसोबत जीवंत हॅन्डग्रेनेड आल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली तरी त्या ठिकाणी ते हॅन्डग्रेनेड आले कसे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे गुरूवारी (दि.२४) दुपारी घडली.प्राप्त माहितीनुसार, कोकडीनजिकच्या नाल्यात रोजगार हमी योजनेवरील मजूर खोदकाम करून फावड्याने माती काढत असताना वासुदेव भेंडारे या मजुराच्या टोपल्यात मातीसोबत एका प्लास्टिक पिशवित ठेवलेले हॅन्डग्रेनेड आले. ही काय वस्तू आहे म्हणून त्यांनी कुतूहलाने हाती घेऊन पाहिले. पण काही समजले नसल्याने ती पिशवी बाजुला फेकली. यावेळी सुदैवाने तो बॉम्ब फुटला नाही. मजुरांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी कामावर हजर असलेल्या ग्राम रोजगार सेवकाला सांगितले. त्याला बॉम्बची शंका आल्याने लगेच पोलिसांना माहिती दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, देसाईगंज ठाण्याचे निरीक्षक मांडवकर, तहसीलदार सोनवणे, गटविकास अधिकारी संगीता भांगरे आदी घटनास्थळी दाखल झाले. ते हॅन्डग्रेनेड जीवंत असून ते तिथे कसे आले याचा शोध घेतला जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.दरम्यान बॉम्बशोधक-नाशक पथकालाही गडचिरोलीवरून पाचारण करण्यात आले. ४.१५ वाजता हे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी ते हॅन्डग्रेनेड निकामी केले.

टॅग्स :Crimeगुन्हा