शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून येणारी दारू सीमेवरच पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:09 IST

तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीसाठी येत होती : दोन लाखांच्या बाटल्यांसह वाहन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिरोंचाजवळील गोदावरी नदीच्या पुलावर तेलंगणा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके बसविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणात जाणाऱ्या व तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची दोन्ही नाक्यांवर कसून तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान आहे. या मतदानासाठी तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारू पोहोचवली जात आहे, अशी गोपनीय माहिती कालेश्वरम पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार सीमारेषेजवळ पाळत ठेवण्यात आली. तेलंगणा राज्यातून एचएच ३३- ७५३ क्रमांकाच्या टाटा सुमोची तपासणी केली असता, या सुमात सुमारे ६० विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. दारू व वाहन जप्त करण्यात आले.वाहनचालक व्यंकटेश व त्याचे साथीदार, किशोर, विमय्या या तिघांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी सिरोंचा येथील नागरिक असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. सदर कारवाई महादेवपुरम पोलीस स्टेशनचे पीएसआय रणजितकुमार व कालेश्वरम पोलीस मदत केंद्राचे पीएसआय श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी