कढोली येथे दोन वर्षांपूर्वी ३३ के.व्ही.चे वीज केंद्र सुरू करण्यात आले. या विद्युत केंद्रामुळे कढाेली, सावलखेडा, सोनेरांगे, जांभळी, वासी ,गांगोली खरकाडा या गावातील नेहमी भेडसावणारी कमी विद्युत दाबाची समस्या कमी झाली आहे. मात्र वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठ्याची समस्या अधिक वाढली आहे. सिंचन सुविधा वाढल्याने कढाेली आणि परिसरात उन्हाळी धान लागवडीचे क्षेत्रात वाढले आहे. मात्र वीजपुरवठा नेहमी खंडित हाेत असल्याने धानपीक चिंतित आहेत. वीज पुरवठ्याची समस्या आमदार कृष्णा गजबे आणि जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम यांच्या लक्षात आणून दिली. पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क केला असता त्याही समस्या एप्रिल, मे महिन्यापर्यंत कायम राहील. पण शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेता दुसऱ्या भागातून अधिक विद्युत पुरवठा प्रवाहित करता येईल का याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे सांगितले.
विजेच्या लपंडावाने धानपीक धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST