शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यावरील रक्ताचे डागांमुळे पिता- पुत्रासह तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 21:15 IST

तान्हापोळ्यादिवशी भरचौकात तरुणाची हत्या: पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत फेकले जंगलात

संजय तिपाले / गडचिरोली: पूर्ववैमनस्यातून भरचौकात तरुणाची हत्या करुन मृतदेह जंगलात फेकला. मात्र, अंगातील कपड्यांच्या डागांमुळे तीन आरोपींना जन्मठेप व पावणे तीन लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली. आरोपींमध्ये पिता- पुत्राचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील सात वर्षांपूर्वी तान्हापोळ्याच्या दिवशी झालेल्या बहुचर्चित खून खटल्याचा निकाल २१ मे रोजी येथील विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम एम. मुधाेळकर यांनी दिला.

दिनेश दिगांबर झिलपे (३७, रा. कोंढाळा) असे मयताचे नाव आहे. शामराव सोमा आलोने (५७), त्याचा मुलगा विनायक शामराव आलोने (३७) व राजू ढोरे (३६, सर्व रा. कोंढाळा) यांचा शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. शामराव आलाेने याचे चौकात कटलरी साहित्याचे दुकान होते. दिनेश झिलपे हा त्यास न विचारता दुकानातून साहित्य नेत असे. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. घटनेच्या आधी एक वर्षापूर्वी याच वादातून शामराव आलोने याने दिनेशवर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. मात्र, नंतर त्यानेच उपचारखर्च केला, त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले नाही. मात्र, नंतर आलोने पिता- पुत्र दिनेश झिलपेकडे उपचारासाठी केलेला खर्च परत कर, अशी मागणी करु लागले. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा बिनसले.

२४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी साडेसात वाजता चौकातील एका पानटपरीजवळ उभ्या असलेल्या दिनेश झिलपेवर लोखंडी रॉड व पावड्याने हल्ला केला. यात तो जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर या तिघांनी दुचाकीवरुन त्याचे प्रेत कोंढाळा- रवी रोड मार्गे जंगलात नेऊन फेकले.  दिनेशचे वडील दिगांबर झिलपे यांनी देसाईगंज ठाण्यात तक्रार दिली.   पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले. तत्कालीन उपअधीक्षक शैलेश काळे, सहायक निरीक्षक अतुल तवाडे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान व सहायक सरकारी वकील नीलकंठ एम. भांडेकर यांनी न्यायालयात सादर केले. दंडाची एकूण पावणे तीन लाख रुपयांची रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  मृताच्या पत्नीसमोरच हत्येचा थरारतान्हापोळा असल्याने घटनेच्या दिवशी मयत दिनेश झिलपेची पत्नी नीता ही त्यास घरी बोलावून आणण्यासाठी चौकात आली होती. यावेळी हे तिघे त्याच्यावर रॉड व पावड्याने हल्ला करताना आढळून आले. ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिच्यासह इतर आठ ते नऊ जणांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली