शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

१०० शेतकऱ्यांनी गिरविले सगुणा पध्दत भात लागवडीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:55 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली.

अंमलबजावणी करण्याचे चंद्रशेखर भारसावले यांचे आवाहन : कृषी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थितगडचिरोली : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बचत गटातील १०० पुरूष व महिला शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सगुणा पध्दतीने भात लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन रायगडचे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भारसावले यांनी केले. विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे होते. विशेष अतिथी म्हणून रायगडचे अनिल निवलकर, राजेश वाणी तर प्रमुख अतिथी म्हणून माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, अश्विनी जांभुळकर, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भारसावले म्हणाले, आपल्याकडची शेती नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. कमी खर्चाची, कमी श्रमाची, कमी नुकसानीची व जास्त उत्पन्न देणारी शेतीची पध्दती म्हणजेच सगुणा पध्दतीने भात लागवड होय. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली वसाके यांनी केले तर आभार चारूदत्त वाढई यांनी मानले. सदर कार्यशाळेला निलेश सांगोले, सचिन नरूले, सतीश प्रधान, विक्रम त्रिपदे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात दोन हजार एकरात एसआरटी पध्दतीने लागवडमाविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, उपजीविका सल्लागार, तालुका व्यवस्थापक, सहयोगिनी व गावातील प्रेरक महिलांनी आत्मा कार्यालयाच्या सहकार्याने रायगड येथे अभ्यासदौरा केला व तेथून सगुणा पध्दतीने भात लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात केले. या पध्दतीने भात लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून तीन वर्षात २०० गावात १० हजार एकर पर्यंत एसआरटी पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात या वर्षात दोन हजार एकरपर्यंत सगुणा पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बाबत कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुल्यांकन करण्यात येणार आहे.