शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शिक्षणाबरोबरच व्यवसायाचेही धडे

By admin | Updated: February 3, 2015 22:55 IST

शिक्षण घेतलेल्या मुलींना पुढे बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालयाने कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींना दैनंदिन शिक्षणाबरोबरच शिवणकाम,

अहेरी : शिक्षण घेतलेल्या मुलींना पुढे बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालयाने कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींना दैनंदिन शिक्षणाबरोबरच शिवणकाम, ब्युटीपार्लर, एम्ब्रायडरी आदी व्यवसायांचे प्रशिक्षण दिले असून अनेक मुलींनी यामध्ये कौशल्यसुद्धा आत्मसात केले आहेत. अहेरी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाने इंदाराम येथे मुलींसाठी स्वतंत्र कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात दुर्गम भागातील बहुतांश आदिवासी समाजाच्या मुली शिक्षण घेत आहेत. वाढत्या स्पर्धेमध्ये या मुलींना शासकीय नोकरी जरी लागली नाही. तरी त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी या विद्यार्थिनींना शिवणकाम, ब्युटीपार्लर, एम्ब्रायडरीचे प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेचे नियमित तास सुटल्यानंतर हे प्रशिक्षण दिले जात आहे. तिनही प्रशिक्षणासाठी अत्यंत कमी भांडवलाची गरज असून ग्रामीण भागात महिन्याचे सात ते आठ हजार रूपये सहज कमाई होऊ शकते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच सदर प्रशिक्षणाची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनी स्वावलंबी बनण्यास फार मोठी मदत झाली आहे. सदर प्रशिक्षण इंडियन इस्टिट्यूट आॅफ युथ वेल्फेअर नागपूर व एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जात आहे. प्रशिक्षक म्हणून नंदा मद्दीवार, निकिता तोडसाम, सरिता कांडुरवार काम करीत आहेत. प्रशिक्षण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डी. वाय. ढवस यांच्या मार्गदर्शनात दिले जात आहे. याबाबत विद्यार्थिनींनीही समाधान व्यक्त केले आहे.