नाशिकरोड : देवळाली गाव येथील रोकडोबावाडीतील डोबी मळा परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन घडत होते.रोकडोबावाडीजवळील डोबी मळा परिसरात वालदेवी नदीकिनारी अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. पाण्यासाठी बिबट्या वालदेवी नदीकिनारी तसेच लगतच्या मळे परिसरात फिरत होता. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना दिवसाही या बिबट्याचे दर्शन घडले होते. सदर बाब नागरिकांनी वन विभागाला कळविल्यानंतर दोन दिवसांपूर्वी डोबी मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळ्यांनी मळ्यातील लोक जागे झाले. पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे समजताच नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.
वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
By admin | Updated: May 25, 2015 01:56 IST