शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना

By गेापाल लाजुरकर | Updated: August 31, 2023 19:28 IST

रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले.

गडचिराेली : रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले. ही घटना गडचिराेली तालुक्यातील बाेदली गावाजवळ कक्ष क्रमांक १७६ मध्ये बुधवार ३० ऑगस्ट राेजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. दुशान जगन्नाथ देऊरमले (२७) रा. चेक हत्तीबाेडी ता. पाेंभुर्णा जि. चंद्रपूर असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.बाेदली येथील अशाेक नैताम यांच्या घरी दुशान देऊरमले हा आपल्या बहिणीकडे रक्षाबंधन सणानिमित्त ओवाळणीसाठी आला हाेता. रक्षाबंधनाची ओवाळणी आटाेपून ताे बुधवारी सकाळी स्वगावाकडे दुचाकीने अन्य एका सहकाऱ्यासाेबत निघाला. दरम्यान धानाेरा-गडचिराेली मार्गावर बाेदलीपासून १ किमी अंतरावरील झुडपांलगत ताे सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास शाैचास बसला. याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. तेव्हा साेबतचा व्यक्ती व अन्य काही लाेकांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. खांदा व पाेटावर जखमबिबट्याने हल्ला केल्याने दुशान देऊरमले यांच्या खांद्यावर बिबट्याच्या दाताची तर पाेटावर पंज्याच्या नखांची जखम आहे. दुशान यांना वेळीच रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर क्षेत्रसहायक श्रीकांत नवघरे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली व वेळीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रात्री पुन्हा दर्शन देऊरमले यांच्यावर हल्ला करणारा बिबट बुधवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास काही वाहनधारकांना रस्त्यावरच ठाण मांडलेल्या स्थितीत दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर आहे. बिबट्यापासून लाेकांच्या जीविताला धाेका आहे. त्यामुळे नागरिकांनी बाेदली परिसरातील जंगलात जाऊ नये, असे आवाहन क्षेत्रसहायक क्षेत्रसहायक श्रीकांत नवघरे यांनी केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीleopardबिबट्या