शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

विकासाच्या नियोजनात शेवटच्या घटकाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:30 IST

भाजप शासन सत्तेत आल्यापासून वीज, रस्ता, सिंचन, शिक्षण, पाणी, गॅस, शौचालय आदी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : कुरूड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भाजप शासन सत्तेत आल्यापासून वीज, रस्ता, सिंचन, शिक्षण, पाणी, गॅस, शौचालय आदी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. नियोजन करताना तळागाळातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे १६ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बांधली जाणार आहे. या योजनेचे भूमीपूजन रविवारी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, सहउद्घाटक जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, पं.स. सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, डॉ. भारत खटी, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, पं.स. सदस्य उषा सातपुते, रेखा नरोटे, माजी पं.स. सभापती केशव भांडेकर, मधुकर भांडेकर, रघुनाथ भांडेकर, कार्यकारी अभियंता संजय वाघ, उपविभागीय अभियंता रत्ना बिष्णोई, सरपंच वनिता मेश्राम, वनिता वासेकर, भाविका देवतळे, जयश्री दुधबळे, भारती किरमे, उपसरपंच रमेश सातपुते, लालाजी भोयर, शालू सातपुते, उदयसिंग भिरबंशी, रमेश गव्हारे, सचिव विशाल चिळे, साईनाथ बुरांडे, बाबुराव शेंडे, पोलीस पाटील यामिनी भोयर उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर असून विकासासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानात चामोर्शी तालुका मागे असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात खासदार अशोक नेते यांनी सबका विकास या ब्रिदवाक्यानुसार १०० दिवसात १०० योजनांच्या माध्यमातून सामान्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी अनेक प्रलंबित योजना भाजपा सरकारच्या काळात मार्गी लागल्या आहेत, असे मार्गदर्शन केले.संचालन पुरूषोत्तम गायकवाड, प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ तर आभार गुणवंत शेंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वीर शिवाजी कला क्रीडा मंडळ व कुरूड येथील नागरिकांनी सहकार्य केले.नळ योजनेत या गावांचा आहे समावेशकुरूड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये १६ गावे समाविष्ट आहेत. यामध्ये कुरूड, नाचनगाव, रामपूर, रामपूर टोला, आमगाव, विसापूर, खोळदा, हिरवगाव, जान्हाळा, आमगाव, आमगाव चक नंबर १, रेखेगाव, अनंतपूर, वालसरा, राजनगट्टा, भिवापूर, कुंभारवाही या गावांना पाणी पुरवठा होणार आहे. ८ कोटी ६४ लाख रूपये एकूण खर्च सदर योजनेवर केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत होईल.