शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्क्या रस्त्यांचा अभाव; २० गावांतील नागरिकांचा सुरू आहे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:46 IST

रेगुंठा परिसर : प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या रेगुंठा परिसरातील तब्बल २० गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते नाहीत. ग्रामसडक योजनेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या परिसरातील, गावांतील नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे शासन व प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांचा आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर रेगुंठा हे गाव आहे. या परिसरात अद्यापही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसह इतर कामांसाठी अनेकदा तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र, पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांना त्रासदायक प्रवास करावा लागतो. पर्सेवाडा बेज्जूरपल्ली मार्गाने जीव धोक्यात घालून पहाडीवरून कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. पर्सेवाडा- बेज्जूरपल्ली हा मार्ग सिरोंचा व अहेरी या दोन्ही तालुक्यांना जोडतो. येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे, रेगुंठा परिसरांतर्गत रेगुंठा, कोटापल्ली, कोत्तूर, नारसिंहापल्ली, मुलदिम्या, मोयाबीनपेठा, बोकाटगुडम, दर्सेवाडा, पिरमडा, येल्ला, पर्सेवाडा, चिक्याला आदींसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या परिसरातील गावांची लोकसंख्या १५ ते १८ हजारांच्या आसपास आहे. सदर गावांतील नागरिकांना विविध कामांसाठी सिरोंचा तालुका मुख्यालय गाठावे लागते. मात्र पक्क्या रस्त्यांअभावी त्यांची वाट खडतर बनली आहे. 

बसफेरीही बंद 

  • रेगुंठा परिसरात पक्के रस्ते नसल्याने या भागातील बसफेरी बंद आहे. बसफेरीअभावी नागरिकांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. हा प्रवास बारमाही सुरू आहे. आणखी किती दिवस हा प्रवास सुरू राहणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. 
  • रेगुंठा परिसरातील अनेक नागरिक दररोज विविध कामानिमित्त तालुका मुख्यालय सिरोंचा व अहेरी येथे येतात. त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकGadchiroliगडचिरोली