लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे शासन व प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक कमालीचे त्रस्त झाले आहेत.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून कित्येक वर्षापासून या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली नाही. छताची दुर्दशा झाली असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात या केंद्राला पाणी गळती लागते. इमारत जीर्ण झाली असल्याने पावसाळ्यात येथील रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरूस्तीच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून या इमारतीची डागडुजी केली जाते. परंतु हे काम योग्यरित्या होत नसून अर्धवट स्थितीत केल्या जात असल्याने समस्या कायम आहे.येथील कर्मचाºयांच्या निवासस्थानाची सुद्धा अवस्था अतिशय वाईट आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील १५ ते २० गावातील नागरिक औषधोपचारासाठी येत असतात.एटापल्लीच्या रुग्णालयात केले जाते रुग्ण रेफरएटापल्ली येथील रहिवासी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत गादेवार हे गट्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत होते. त्यांना केंद्रात जाणवणाºया आरोग्य समस्येबाबत ते वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्याकडून प्रामाणिक सेवा सुरू असताना अचानकपणे त्यांची येथून इतरत्र बदली करण्यात आली. आता या केंद्रात असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून फारशी सेवा देत नाही. परिणामी आदिवासीबहुल दुर्गम भागातील रुग्णांना सोयीसुविधा नसल्याच्या कारणावरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. हे प्रमाण अलिकडे वाढले आहे.
गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सोयीसुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून कित्येक वर्षापासून या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली नाही.
गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सोयीसुविधांचा अभाव
ठळक मुद्देइमारतीची दुरवस्था । पावसाळ्यात लागते पाणी गळती, रुग्ण व नातेवाईक त्रस्त