शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रावर बारदान्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:18 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : महामंडळाकडून महिनाभरापासून पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र हा बारदाना लवकरच संपला. त्यानंतर महामंडळाच्या वतीने केंद्रांवर बारदान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला बारदाणाही संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आले आहेत.ज्या शेतकºयांकडे बारदाना उपलब्ध आहे, त्याच शेतकऱ्यांचे धान महामंडळ व संस्थांच्या वतीने खरेदी केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:चा बारदाना उपलब्ध नाही, असे शेतकरी धानविक्री प्रक्रियेत अडचणीत सापडले आहेत.धानाची विक्री करूनही एक महिना उलटला. मात्र महामंडळाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा करण्यात आले नाही. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी शेतकऱ्यांचे धान चुकारे अदा करण्यात आले. मात्र त्यानंतर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धान चुकारे प्रलंबितच आहे. घोट परिसरात गुंडापल्ली, गिलगाव, घोट, भाडभिडी, रेगडी, सोनापूर, मक्केपल्ली, अड्याळ, आमगाव, मार्र्कंडा (कं.) आदी १० धान खरेदी केंद्र आहेत. सदर १० केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा आहे. मात्र या गंभीर बाबीकडे आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन घोट परिसरातील सर्वच १० केंद्रांवर बारदान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. बारदाना लवकर उपलब्ध न झाल्यास धानविक्रीअभावी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होणार आहे.शेतकऱ्यांकडून ३० हजार बारदान्याची खरेदीघोट व भाडभिडी केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ३० ते ४० हजार इतका बारदाना संस्थेच्या वतीने खरेदी करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांकडेही बारदाना शिल्लक नसल्याने महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. येत्या काही दिवसांत आविका संस्थांच्या केंद्रांवर बारदाना उपलब्ध न झाल्यास अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे नेऊन आपल्या धानाची विक्री करण्याची शक्यता आहे. मात्र खासगी व्यापाऱ्याकडे रास्त भाव मिळत नाही. यात शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होत असते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी