शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बॉटलने बांधणार कुरमा घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब लक्षात घेऊन मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटलपासून सदर भिंत तयार करण्याचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण उपक्रम : धानोराच्या मुनघाटे महाविद्यालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सोशल वेल्फेअर असोसिएशन मुंबई व जी.सी.पाटील मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो तथा पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ९ हजार ५०० टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सपासून तुकूम येथे कुरमाघराची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे.आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब लक्षात घेऊन मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटलपासून सदर भिंत तयार करण्याचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.प्लास्टिकच्या बॉटल पर्यावरणाला अत्यंत घातक राहतात. तरीही त्या अस्ताव्यस्त फेकल्या जातात. रासेयो व पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी फेकल्या गेलेल्या ९ हजार ५०० बॉटल गोळा केल्या. या बॉटलमध्ये माती भरली. सदर बॉटलवर सिमेंटचा मसाला टाकून भिंत तयार केली आहे. बॉटलच्या झाकणांना आकर्षक रंग देण्यात आले आहे. या भिंतीला बाहेरच्या बाजूने प्लास्टर केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पाणी खोलीत येणार नाही. कुरमा घरासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम करण्याचा प्रयत्न शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.या उपक्रमासाठी प्रकल्पाचे संयोजक अभियंता प्रशांत मद्मवार, तालुका समन्वयक अमोल ठाकरे, समुदाय संघटक गणेश गुड्डी यांच्यासोबतच सरपंच अमोल गेडाम, प्राचार्य राजू किरमिरे, डॉ.गणेश चुधरी, प्रा.पंढरी वाघ, प्रा.ज्ञानेश बन्सोड, डॉ.सोनाली ढवस, प्रा.डी.व्ही.झाडे, प्रा.एम.तोंडरे, प्रा.एन.पुण्याप्रेड्डीवार, प्रा.पी.वाळके हे सहकार्य व मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास