शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

ग्रामसेवकांनी सूपूर्द केल्या बीडीओंना चाब्या

By admin | Updated: November 18, 2016 01:27 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून

जिल्हाभर आंदोलन : ग्रा.पं.चे कामकाज झाले पूर्ण ठप्पगडचिरोली : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे तीन टप्पे यापूर्वी पार पडलेत. चौथ्या टप्प्यात गुरूवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपल्या पंचायत समितीतील बीडीओकडे आपल्या ग्रामपंचायतीच्या दप्तराच्या चाब्या सूपूर्द केल्या. या पवित्र्यामुळे जिल्हाभरातील जवळजवळ ४६७ ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर यांच्या नेतृत्वात ७ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतरही राज्य सरकारने ग्रामसेवकांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्याने आता चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून ग्रा.पं.च्या चाब्या बीडीओंकडे सुपूर्द करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पचारे यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, तालुका अध्यक्ष जीवनदास ठाकरे, उपाध्यक्ष विनोद कोटगीरवार, कोषाध्यक्ष मंगल डाखरे, श्रीकृष्ण मंगर, विनोद आखाडे, प्रमोद तुपारे, राकेश सावणकर, कन्नाके, करूणा कोडापे, अर्चना श्रीगिटवार, मोनाक्षी डोहे, खोब्रागडे, प्रिती त्रिशुलवार, सिडाम, हेमंत गेडाम, दामोदर उप्परवार, संजय बानाईत आदी उपस्थित होते. आरमोरी तालुक्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू करून ग्रामपंचायतीच्या चाब्या पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार, सहायक गट विकास अधिकारी पी. आर. रायपुरे यांच्याकडे सूपूर्द केल्या व मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष एन. एम. घुटके, तालुका ग्रामसेवक युनियनचे एन. पी. जौंजाळकर, पी. पी. हुड, व्ही. आर. ढोरे, व्ही. टी. मैंद, एस. एम. मुळे, जे. टी. शिवणकर, जी. डी. गावित, डी. वाय. काशिवार, व्ही. एस. कुमरे, एन. ए. बन्सोड, एस. ए. रामटेके, पी. आर. लढये, बी. टी. जौंजाळकर, आर. बी. माकडे, पी. एन. मोहुर्ले, के. आर. बरडे, एस. एच. शेबे, यू. एन. प्रधान, एल. टी. भांडेकर, जी. पी. फुलझेले, के. जी. सोमनकर, जी. पी. दुधे, दुमाने, कोपुलवार, ए. एन. डाखरे, एस. वाय. लटे आदी उपस्थित होते.धानोरा तालुक्यातील ग्रामसेवकांनी धानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांना निवेदन देऊन ग्रा.पं.च्या चाब्या सुपूर्द केल्या. संघटनेचे तालुका अध्यक्ष खुशाल नेवारे, रमेश बोरकुटे, संजीव बोरकर, पांडुरंग बुरांडे, जयंत मेश्राम आदी उपस्थित होते. एटापल्ली तालुक्यातील ग्रामसेवकांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतीच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष एस. टी. लोंढे, सचिव एम. यू. गेडाम, कोषाध्यक्ष किशोर वझाडे, डी. पी. झाडे, जी. एम. बोरकुटे, एन. जे. पेंदोर, एन. जी. राऊत, पोरटे, गेडाम, धुर्वे, शेंडे, बाटवे, वाळके, फूलकंवर, नरोटे, कन्नाके, जांभुळे, घुटके, बन्सोड, बंदेला, उईके उपस्थित होते. जिल्ह्याच्या कोरची, देसाईगंज, कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी, अहेरी आदी तालुका मुख्यालयातही ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गुरूवारी आंदोलन करून ग्रामपंचायतीच्या चाब्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे ग्रा.पं.मधील दैनंदिन काम ठप्प झाले असून केवळ लिपिकाच्या भरवशावर काही ठिकाणी काम होत आहे.