शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

स्वच्छतेतून गाव निरोगी ठेवा

By admin | Updated: October 7, 2015 02:27 IST

गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे.

खासदारांचे गावकऱ्यांना आवाहन : तळोधी मो. येथे ग्रामस्वच्छतेवर मार्गदर्शन कार्यक्रमतळोधी मो. : गावात स्वच्छता ठेवणे अत्यावश्यक आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहिल्यास गावाचा विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी घर, घरासभोवतालचा परिसर व संपूर्ण गावाची स्वच्छता राखावी, जेणेकरून गाव निरोगी राहील, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी गावकऱ्यांना केले. राष्ट्रीय स्वच्छता मिशन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, चामोर्शीच्या पं.स. सभापती शशी चिळंगे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, पं.स.चे माजी उपसभापती बंडू चिळंगे, ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, उपसरपंच किशोर गटकोजवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कुनघाडकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, तळोधी मो. गावाच्या विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावात विकासासाठी पुढाकार घ्यावा, गावकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. असे अभिवचनही खासदार नेते यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी, रवींद्र ओल्लालवार यांनी गावाच्या विकासासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच माधुरी सुरजागडे, संचालन ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले यांनी केले तर आभार विनायक कुनघाडकर यांनी मानले. (वार्ताहर)