शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 02:07 IST

आगामी नगर पालिका निवडणूक कार्यक्रम राबविताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच उमेदवारांचा खर्च

मतदार जागृतीवरही भर : पालिका निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशगडचिरोली : आगामी नगर पालिका निवडणूक कार्यक्रम राबविताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच उमेदवारांचा खर्च आणि मतदार जागृती याबाबत सर्वांनी लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिल्या.गडचिरोली आणि देसाईगंज नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याबाबत जिल्हा स्तरावर संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची सभा मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवडणुकीसाठीचे मुख्य निरिक्षक तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, गडचिरोली नगर परिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदी उपस्थित होते. या दोन्ही नगरपरिषदांमध्ये या बैठकीपूर्वी राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या बैठका मंगळवारी झाल्या. त्यात राजकीय पक्षांनी कोणत्या बाबींचे पालन करायचे आहे याची त्यांना माहिती देण्यात आली. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना होणाऱ्या गैरप्रकारांबाबत माहिती देता यावी यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिक ७४४८२८२४७३ या क्रमांकावर व्हाट्सअ‍ॅप मार्फत अशी माहिती देऊ शकतात असे नायक यांनी सांगितले. उमेदवारांना निवडणुकीसाठी नव्याने खाते उघडून त्यामार्फतच सर्व आर्थिक व्यवहार करायचे आहे. हीच पध्दत राजकीय पक्षांनाही लागू आहे. चलन बदलाच्या पार्श्वभूमीवर बँकांमधील गर्दी लक्षात घेता बँकांनी या कामासाठी वेगळेपणाने पुढाकार घ्यावा असेही नायक म्हणाले. वृत्तपत्रातील जाहिरांती तसेच पेडन्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. सर्व मुद्रकांचीही बैठक घेऊन त्यांना निवडणूक नियमावली व मुद्रकांवर असणारी बंधने याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे यावेळी सांगत आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीस अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक डॉ. बी. एस. तळवी, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे गजानन भोयर आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)भरारी पथक तैनात होणारगडचिरोली व देसाईगंज पालिकेच्या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मद्य आणि पैशाचा वापर उमेदवार तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी व्हिडिओ शुटींगसह असणारी प्रत्येकी दोन भरारी पथके सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. याखेरीज नगर परिषद स्तरावर दोन पथके वेगळी राहणार आहे. या पथकाची नजर २४ तास निवडणुकीच्या प्रचार कार्यावर राहणार आहे.