शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशी पालन करा अन् ५० टक्के अनुदान मिळवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:05 IST

Gadchiroli : ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) राबविली जाते. यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मधमाशी पालनातून बेरोजगारांना व्यवसाय उभारणीची संधी प्राप्त झाली आहे. 

मधमाशी पालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुकांना ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचे प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी मंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र भवनात प्राप्त होणार आहेत. अधिक माहितीसाठी मधुक्षेत्रिक मुलकलवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असल्याने येथे मधमाशी पालन व्यवसायाला वाव आहे.

जमिनीबाबत काय आहेत निकष?लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्थानोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे किवा १० वर्षासाठी भाडेतत्त्वावर किमान १ एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे. १ हजार चौरस फूट इमारत असावी.

अकुशल मध संकलनामुळे धोकाजिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक जंगलात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पोळ्यांतून मध संकलन करतात. या मध संकलनामुळे माश्यांकडून हल्ला होण्याचा धोका असतो. माश्यांनी मोठ्या प्रमाणात देश केल्यास व्यक्तीचा जीवही जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मधमाशी पालन तसेच संकलनाचे प्रशिक्षणसुद्धा मिळणे आवश्यक आहे.

काय आहे पात्रता?• वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.• स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.• वय १८ वषर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, तर केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक स्वरूपाचा असावा.• किमान १० वी उत्तीर्ण असावा.• २१ वर्षापेक्षा जास्त वय असावे.• अशा व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी, आदी पात्रता आवश्यक आहे.• पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लाभ दिला जाईल.

 

टॅग्स :businessव्यवसायGadchiroliगडचिरोली