कुरखेडा : तालुक्यातील भगवानपूर येथे जय गोंडवाना बिरसा मुंडा गोटूल समितीच्या वतीने कोया पुनेम संमेलन व भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी हाेते. उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हरिराम वरखडे, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, भगवान मडावी, रामचंद्र काटेंगे, मोतीराम वट्टी, फागोजी तुलावी, प्रल्हाद धारणे, फाल्गुन चौके उपस्थित होते. यावेळी आ. डाॅ. होळी यांनी आदिवासींनी आपली विशिष्ट बोलीभाषा व संस्कृतीचा अभिमान बाळगून त्याची जोपासना करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुमरे व राजू परसे यांनी केले. आभार धनराज हलामी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरविंद तुलावी, देवराव उसेंडी, विनाजी तुलावी, हिवराज कोल्हे, विनोद काटेंगे, निलेश तुलावी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
भगवानपूर येथे काेया पुनेम संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST