शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:00 AM

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित : समारंभ व प्रवासासाठी नागरिकांना अडचण

नागभूषणम चकीनारपुवार।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : ब्रिटिशकालीन जिल्हास्तर, ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण तसेच सर्वात जुने तालुका मुख्यालय अशी सिरोंचाची ओळख आहे. एवढा वारसा लाभलेले शहर बसडेपोअभावी अपेक्षितच आहे. सिरोंचा येथे बसडेपोची निर्मिती केव्हा होणार याची तालुक्यातील नागरिकांना अनेक दिवसांपासून अद्यापही प्रतीक्षा आहे.सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल. सिरोंचा तालुका मुख्यालय तेलंगणा, छत्तीसगड राज्यासाठी मध्यवर्ती ठिकाण होईल. त्यामुळे येथे बसडेपोची आवश्यकता आहे. तालुक्यात १४८ गावे आहेत. मुख्यालयी अनेक शासकीय कार्यालये, बँका आहेत. दररोज हजारो नागरिकांचे आवागमन शहरात असते. परंतु जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोनच ठिकाणी बसडेपो आहे. अहेरी ते सिरोंचा हे अंतर ११० किमी आहे. तसेच गडचिरोलीपर्यंत हे अंतर २२० किमी आहे. त्यामुळे सिरोंचासाठी वेळीच बसगाड्या उपलब्ध होत नाही.सिरोंचा तालुका नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, जंगलव्याप्त असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालयी शिक्षण घेण्यासाठी येताना अडचणी येतात. वेळीच बसेस उपलब्ध होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच तालुक्यातील नागरिकांना लग्न समारंभ, अन्य कार्यक्रमांसाठी बसेसची आवश्यकता असल्यास अहेरी डेपोमध्ये जावे लागते. येथे बस उपलब्ध झाल्यास सोयीचे ठरते. परंतु अनेकदा बसेस उपलब्ध होत नाही. बस उपलब्ध होऊनही संबंधित नागरिकांना अतिरिक्त भाड द्यावे लागते. तालुका मुख्यालयापासून प्राणहिता पुलामार्गे मंचेरिअल जिल्हा ७० किमी अंतरावर आहे. गोदावरील पूल कालेश्वरमार्गे जयशंकर भोलापल्ली जिल्हाही ७० किमी अंतरावर आहे. दोन्ही जिल्ह्यात तेलंगणा राज्याचे बसडेपो आहेत. परंतु सिरोंचा येथे बसडेपो नसल्याने नागरिकांना बसेससाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटकांची गर्दीसिरोंचा तालुक्यात त्रिवेणी संगम, तेलंगणा राज्यात कालेश्वरम देवस्थान आहे. तालुक्यातील वडधम जवळील ज्युरासिस पार्क प्रसिद्ध आहे. पोचमपल्लीजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेज, नदीपात्रातील कालवा यासह विविध पे्रक्षणीय स्थळे आहेत. या स्थळांना अनेक पर्यटक भेटी देतात. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यादृष्टीने बसडेपो आवश्यक आहे.विशेष म्हणजे शिवसेनेचे सत्यनारायण बुर्रावार यांनी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला तरीपण या मागणीकडे दुर्लक्षच झाले.

टॅग्स :state transportएसटी