मेळाव्याचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी बी.आर. चाटारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच संनू उसेंडी, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ आदी उपस्थित हाेते. याप्रसंगी नागरिकांना दादालोरा खिडकी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या कामाविषयी माहिती देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पोलीस मदत केंद्र, गट्टांतर्गत येणाऱ्या गावातील १७२ नागरिकांना जाॅबकार्ड वितरित करण्यात आले. २१ नागरिकांचे जाॅबकार्ड नूतनीकरणाचे फाॅर्म भरण्यात आले. २० शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान बियाणेवाटप करण्यात आले. वृद्धापकाळ योजनेंतर्गत ६५ महिलांचे ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले. अनुदानित टॅक्टरसाठी दाेन शेतकऱ्यांचे महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यात आले. ११ शेतकऱ्यांना सातबारा, नमुना-८ काढून देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बंडू कोसमशिले, प्रमोद आपटे, पांडुरंग कुमोटी, रामदास मडावी, सुधाकर नारोटे, मोरेश्वर चापले, त्रिशिला गावंडे, अपेक्षा शेंदरे, सोनाक्षी झुरी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.