लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे.एटापल्ली येथील मोठी जागा पंचायत समितीच्या मालकीची आहे. पंचायत समितीच्या कार्यालयापासून गोटूल भवनापर्यंत एटापल्ली-कसनसूर मार्गाच्या दोन्ही बाजुला मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक, हॉटेल चालक, पानठेला, किराणा, गॅरेज, पंक्चर दुरूस्तीची दुकाने थाटण्यात आली होती. सदर अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न यापूर्वी पंचायत समितीच्या अनेक अधिकाऱ्यांनी केला. परंतु व्यावसायिक न्यायालयात गेल्याने त्यांना यश मिळाले नाही. याची संधी साधून काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पक्के घरे बांधली होती. याच्या अनेक तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन बीडीओंनी कानुनी आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या पत्रावरून अतिक्रमण पाडण्यात आले. शनिवारी दिवसभर ध्वनीक्षेपक फिरवून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. काही दुकानदारांनी मात्र आपल्याला नोटीस मिळाली नाही. त्यामुळे अतिक्रमण कसे काढले जाते, ते बघून घेऊ, अशी भूमिका घेतली. सदर जागा पंचायत समितीची नाही. अतिक्रमण काढू नका, अतिक्रमण काढण्यास वेळ द्या, असे म्हणत वकीलाच्या सल्ल्यानुसार निवेदन दिले. राजकीय दबावही आणण्याचा प्रयत्न केला. बीडीओंनी सर्वांची बाजू सांगून घेऊन अतिक्रमण काढले. अतिक्रमण पडल्यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत.या ठिकाणी लवकरच व्यावसायिक गाळे बांधल्या जातील, अशी माहिती लोकमतला दिली. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी एस. एन. सिलमवार हजर होते. ठाणेदार सचिन जगताप यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
एटापल्लीतील अतिक्रमणावर चालला जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:59 IST
एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे.
एटापल्लीतील अतिक्रमणावर चालला जेसीबी
ठळक मुद्देपोलिसांचा तगडा बंदोबस्त : पंचायत समितीसमोरील जागा केली मोकळी, बीडीओंसह इतरांचा पुढाकार