ग्रामसेवक भवनात सभा : २० डिसेंबरला स्नेहमिलन व परिचय सोहळ्याचे आयोजनगडचिरोली : गडचिरोली शहरातील जैन कलार समाजाचे संघटन धोरण व वाटचालीवर विचारमंथन रविवारी समाजाच्या सभेत करण्यात आले. ग्रामसेवक भवनात पार पडलेल्या सभेत २० डिसेंबर रोजी समाजाचा स्नेहमिलन सोहळा व परिचय मेळावा पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. सभेला भूषण समर्थ, विनोद शनिवारे, मनोज कवठे, अरूण हरडे, रतन शेंडे, नितीन डवले, प्रदीप रणदिवे, सुधीर शेंडे, प्रदीप लाड, अनिल हजारे, डॉ. उमेश समर्थ, विजय मुरकुटे, स्वप्नील मोटघरे, ओमकार फटिंग, प्रमोद शेंडे, राजेंद्र खानोरकर, रवींद्र समर्थ, राजेंद्र घुगरे, कविश्वर बनपूरकर, रमेश समर्थ, चेतन समर्थ, अनिल तिडके, धनराज गुरू, मंगेश रणदिवे, दिलीप आष्टेकर, ताराचंद समर्थ, वामन मानापुरे, शुभम रणदिवे आदी उपस्थित होते. सभेत जैैन कलार समाज संघटन धोरण व वाटचालीवर मनमोकळी चर्चा करण्यात येऊन पुढील कार्यक्रमाची दीशा ठरविण्यात आली. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जैैन कलार समाज स्नेहमिलन व परिचय सोहळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच समाजातील गुणवंत, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील सर्व जैैन कलार कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून त्यांची एकत्रित माहिती कुटुंब सदस्य विवरण पत्रात भरण्याचे ठरले. २० डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या स्नेहमिलन व परिचय सोहळ्यास शहरातील सर्व जैैन कलार समाज सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभेत करण्यात आले.
जैन कलार समाजाचे विचारमंथन
By admin | Updated: November 30, 2015 01:24 IST