शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आकर्षक उपक्र मांमुळे आदिवासी वसतिगृहाला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच ‘एकच ध्यास.. फक्त अभ्यास..’ असे वाक्य ध्यान आकर्षित करते. वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोपयोगी विविध सोयीसुविधा पुरवणे महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला उपयुक्त ठरेल, वसतिगृहात प्रसन्न वाढवेल असे वातावरण तयार करणे तितकेच महत्वाचे ठरते.

ठळक मुद्देनिसर्गरम्य वातावरण : अभ्यासाच्या वातावरणासह शारीरिक व बौद्धिक विकासाला देतात चालना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निसर्गाच्या सानिध्यात असलेली इमारत... आवारात असलेल्या झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट.. त्यांच्यासाठी फांद्यांवर केलेली पाण्याची सोय... हाकेच्या अंतरावर असलेले घनदाट जंगल.. असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण एखाद्या वनविभागाच्या विश्राम गृहाचे आहे असेच कोणालाही वाटेल. पण नाही, हे आहे गडचिरोलीतील शासकीय आदिवासी वसतिगृहात क्रमांक एक. या वसतिगृहाला आयएसओ मानांकन मिळाले असून असे मानांकन मिळवणारे हे पहिले गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृह ठरले आहे.वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच ‘एकच ध्यास.. फक्त अभ्यास..’ असे वाक्य ध्यान आकर्षित करते. वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोपयोगी विविध सोयीसुविधा पुरवणे महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला उपयुक्त ठरेल, वसतिगृहात प्रसन्न वाढवेल असे वातावरण तयार करणे तितकेच महत्वाचे ठरते. शासकीय वसतिगृह क्र मांक एक गडचिरोली हे यासाठी अत्यंत समर्पक उदाहरण ठरले आहे. विद्यार्थी आणि वसतिगृहाचे अधीक्षक यांच्या संकल्पनेतून या वसतिगृहात विविध कल्पना आकाराला येतात. वसतिगृहाच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळतो तो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रयत्नाने साकार झालेल्या पक्षी पाणवठ्यामुळे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या फांद्यांना पाण्याने भरलेल्या वाट्या लावल्याने उन्हाच्या कडाक्याने तहानलेले विविध पक्षी त्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतात.गडचिरोलीतील बारा गावांमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या कलापथकाने पथनाट्य सादर करत मतदार जनजागृती केली. बौद्धिक ज्ञानाला मिळणारी चालना आणि खेळातील कौशल्यामुळे आज अनेक खेळांच्या स्पर्धांमध्ये या वसतिगृहातील विद्यार्थी चमकले आहेत. बॉक्सिंगसारख्या खेळात प्राविण्य मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कांस्यपदकाची कमाई करून नावलौकिक मिळविला. या आदिवासी वसतिगृहाला आयएसओ मानांकनाचा बहुमान मिळाला याचा आनंद आहे, हे सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. वसतिगृहाला आयएसओ मानांकन देणे हाच उद्देश न ठेवता गुणवत्तापूर्ण काम करत राहाणे हे महत्वाचे आहे, असे मत वसतिगृहाचे गृहपाल रविंद्र यशवंत गजभिये यांनी व्यक्त केले.स्पर्धा परीक्षांसाठी केली जाते तयारीविद्यार्थीच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होऊन त्यांच्या जडणघडणीत कशाप्रकारे हातभार लावतात याचे उदाहरण या वसतिगृहात पहायला मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले वसतिगृहातील पदव्युत्तर विद्यार्थी आपल्या नंतरच्या पदवी वर्गातील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन वर्ग घेतात. यासाठी शाळेत स्वतंत्र शिकवणी वर्गांची सोय करण्यात आली आहे. दिवसातील दोन तास हे वर्ग विविध विषयांच्या मार्गदर्शनासाठी घेतले जातात. यात बुद्धिमत्ता, गणित, इतिहास, भूगोल असे विषय शिकवले जातात. शिकवणी वर्गांच्या मार्गदर्शनाने पोलीस भरती, सैन्य भरती, प्रशासकीय सेवा परीक्षांसाठीची तयारी हे सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात मिळत आहे. शिकवणी वर्गांमुळे अनेकांना आपले यशाचे मार्ग मिळाले, यातूनच वसतीगृहातील विद्यार्थी जिल्हा सांख्यिकी अधिकारी, बाल संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, तसेच सैन्यदलात सैनिक म्हणून सेवारत आहेत.व्यसनमुक्त वातावरण अन् खुली व्यायामशाळाव्यसनमुक्त समाज आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे विद्यार्थी जीवनात मुलांना मिळावेत यासाठी वसतिगृहाच्या आवारात संदेश फलकांनी भिंती सजवण्यात आल्या आहेत. आदिवासी समाजातून आलेले विद्यार्थी व्यसनांना बळी पडू नयेत किंवा जी त्या प्रवाहात खेचली जाण्याची शक्यता आहे त्यांना त्यापासून दूर ठेवता यावे यासाठी खर्रामुक्ती उपक्रम वसतिगृहात राबविला जात आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरु स्ती उत्तम राहावी यासाठी वसतिगृहात खुली व्यायामशाळाही उभारली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, जगाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष, शालेय अभ्यासाच्या अध्ययनासाठी स्वतंत्र अभ्यासिकांची उभारणी करण्यात आली आहे.