गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा आहेत; परंतु येथे अजूनपर्यंत सिंचनाच्या सोयी निर्माण झालेल्या नाहीत. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे येथील शेतीचा विकास झालेला नाही. बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यातील दिना प्रकल्प वगळता काही प्रकल्प कागदावर आहेत, तर काही प्रकल्प रखडलेले आहेत.
जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील रेगडीजवळ दिना प्रकल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांना होत आहे. देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आदी तालुक्यांत नद्या आहेत.
इटियाडोहचे पाणी येईनागोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी केवळ देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या काही गावांपर्यंतच येते, ते पण अपुरे. सध्या या धरणाचे पाणी गाढवी नदीला सोडले जाते; पण कालव्याद्वारे येत नाही.
चिचडोहचा फायदा किती?चामोर्शी शहराजवळ वैनगंगा नदीवर चिचडोह धरण बांधलेले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असले तरी कालवे निर्माण करण्यात आलेले नाही. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी धरणाचा उपयोग होत आहे. कालव्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविण्याची सोय झालेली नाही.
तुलतुली प्रकल्पसुद्धा अपूर्णआरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर केंद्र सरकारकडून तुलतुली प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. ११ मध्यम धरण प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. ते केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.
७५ % कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीनेकाम कोसरी प्रकल्पाचे झाले आहे. गत २० वर्षांनंतरही हे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय १५ ५ वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर ठाणेगाव- डोंगरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर झाले होते.