लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डला ६ मे रोजी आग लागली. सदर आग नैसर्गिकरित्या लागली की एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून आग लावली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देसाईगंज येथील युवक काँग्रेसने पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला ९४ लाख ८ हजार ४१२ रुपयांना देण्यात आले आहे. कंत्राटादरम्यान जो करारनामा झाला त्यात डम्पिंग यार्डवर चौकीदार नेमण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच ओला व सुका कचरा करून प्लास्टिकचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचे वर्गीकरण केले जात नाही. हा कराराचा भंग आहे. यामुळे घनकचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ६ मे रोजी या डम्पिंग यार्डला आग लागली. डम्पिंग यार्डवर चौकीदार असताना आग लागली कशी, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कचऱ्याचे विलगीकरण न करताच महिन्याला लाखो रुपयांचे बिल कंत्राटदार उचलत आहे. आपले घबाड लपविण्यासाठी कंत्राटदाराच्या मार्फत एखाद्या व्यक्तीने कृत्रिम आग लावली असल्याची शक्यता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये मुख्याधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. आगीमुळे नगर परिषदेच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी. स्वच्छतेचे काम बघणारी कंपनी तसेच मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट रद्द करून मुख्याधिकाºयाला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी देसाईगंज युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिंकू बावणे यांनी केली आहे.
डम्पिंग यार्ड जळीत प्रकरणाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:03 IST
देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला ९४ लाख ८ हजार ४१२ रुपयांना देण्यात आले आहे. कंत्राटादरम्यान जो करारनामा झाला त्यात डम्पिंग यार्डवर चौकीदार नेमण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच ओला व सुका कचरा करून प्लास्टिकचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचे वर्गीकरण केले जात नाही. हा कराराचा भंग आहे.
डम्पिंग यार्ड जळीत प्रकरणाची चौकशी करा
ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : कचऱ्याचे विलगीकरण केले जात नसल्याचा आरोप