शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा : सहपालकमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:16 IST

Gadchiroli : २३५ कोटींचा दंड यापूर्वी अवैध मुरूम उत्खननाला झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेल्वेमार्गासाठी महसूल व वनविभागाच्या नाकावर टिच्चून राजरोस मुरूम उत्खननाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 'लोकमत'ने 'रेल्वेमार्गासाठी मुरुमाची लयलूट, महसूल विभागाची डोळ्यांवर पट्टी' या मथळ्याखाली १५ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची अतिशय गंभीरपणे दखल घेत सहपालकमंत्र्यांनी उपरोक्त आदेश दिले.

गडचिरोलीवासीयांचे दिवास्वप्न असलेल्या वडसा गडचिरोली या ५२ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. रूळ बनविण्यासाठी भराव तयार केला जात आहे. याकरिता कंत्राटदार कंपनीने गडचिरोली तालुक्यातील पोर्ला मंडळातील पोर्ला, वसा, वसा चक, नवरगाव, आरमोरी तालुक्यातील चुरमुरा, किटाळी येथे मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध उत्खनन केले. मुरमाची ही लयलूट महसूल व वनविभाग उघड्या डोळ्यांने पाहत असल्याचे वास्तव 'लोकमत'ने उजेडात आणले. सहपालकमंत्री अॅड. जयस्वाल हे १५ रोजी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अवैध मुरूम उत्खननाच्या विषयावर त्यांनी स्पष्ट शब्दांत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा देऊन संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना दिले. 

तहसीलदारांनंतर आता वनाधिकाऱ्यांविरुद्धही तक्रार

  • अंगारा (ता. धानोरा) येथील माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी अवैध मुरूम उत्खननप्रकरणी गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी १३ रोजी केली होती.
  • आता १४ रोजी त्यांनी पोर्ला येथील क्षेत्र सहायक अरुण गेडाम यांच्यासह वनरक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे निवेदन वनसंरक्षक मुख्य एस. रमेशकुमार यांना दिले आहे.
  • कारवाई न झाल्यास २६ मेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीsandवाळूmafiaमाफिया