शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:36 IST

अधिसूचना जारी : तीन विषय तज्ज्ञांना डावलल्याचा वाद ऐरणीवर

गडचिरोली : कोरोना विषाणू संसर्गामुळे येथील गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांची भरती लांबणीवर पडली होती. तीन वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समितीने निवडलेल्या तीन विषय तज्ज्ञांना हटवून नवे विषयतज्ज्ञ नेमले होते. 'लोकमत'ने २१ जून रोजी वृत्त प्रकाशित केल्यावर विद्यापीठाने अधिसूचना जारी करून मुलाखती तात्पुरत्या स्थगित केल्याचे स्पष्ट केले ,परंतु यासाठी राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या तयारीचे कारण दिले आहे.

विषयतज्ज्ञांची वैधता संपुष्टात आली कशी?

गोंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी २४ ते ३० जूनदरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. मात्र, तत्कालीन व्यवस्थापन समितीने निवडलेल्या तीन विषयतज्ज्ञांना डच्चू देत नवीन विषयतज्ज्ञ निवडले होते. पहिली भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना व विषयतज्ज्ञांची नावे कुलगुरुंकडे लिफाफाबंद असताना विषयतज्ज्ञांची वैधता संपुष्टात आली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे मुलाखती वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक भरती, जुन्या निवड समितीतील विषय तज्ज्ञांना डच्चू

दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मात्र नवे विषयतज्ज्ञ निवडण्यापूर्वी राज्यपालांची रितसर परवानगी घेतल्याचा दावा केला. 'लोकमत'ने २१ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यावर अखेर विद्यापीठाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ. अनिल चिताडे व डॉ. ए. एस. चंद्रमौळी यांनी सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ५ जुलै रोजी गडचिरोली दौऱ्यावर आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे शालीन्यास व दीक्षांत समारोह राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार आहे, त्यामुळे मुलाखती स्थगित केल्या जात असल्याचे कारण दिले आहे.

सुटीच्या दिवशीही मुलाखतींचा घातला होता घाट

गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापकांच्या मुलाखतींसाठी पात्र उमेदवारांना बोलावण्यात आले होते. २४ ते ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया होती. या दरम्यान, २५ जूनला रविवारी व २९ जून रोजी बकरी ईदला शासकीय सुटी असतानाही मुलाखती घेण्याचा घाट घातला होता. 'लोकमत'ने याकडे लक्ष वेधले होते, त्यानंतर अखेर मुलाखती स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली