शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मजगीच्या कामांना पसंती

By admin | Updated: February 9, 2016 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

जिल्हाभरात ९९० कामे सुरू : ४६ हजार ५९३ मजुरांच्या हाताला कामगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्रामसभा मजगीच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असून एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची केली जातात. ६ फेब्रुवारीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावरील एकूण ५६२ कामांपैकी सुमारे २६७ कामे मजगीची सुरू आहेत. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक निघाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढते. ग्रामपंचायतस्तरावरच्या कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर आहे. विविध प्रकारचे काम करता येत असले तरी सर्वाधिक कामे मजगीची मंजूर केली जातात. ६ फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर ५६२ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण ३२ हजार ६६७ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ७८ रस्त्याची कामे सुरू असून त्यावर ८ हजार ८७७ मजूर काम करीत आहेत. बोडीची ४५ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर २ हजार ७३७ मजूर काम करीत आहेत. मजगीची २६७ कामांवर १७ हजार ३३२ मजूर काम करीत आहेत. चार शेततळ्यांच्या कामावर ९० मजूर, ८३ सिंचन विहिरींच्या कामावर ८१७ मजूर, वृक्ष लागवडीच्या ३८ कामांवर १३५ मजूर, १० शौचालय बांधकामावर २१ मजूर, १४ भातखाचर कामांवर ८४३ मजूर, सात मामा तलाव दुरूस्तीवर ८३५ मजूर, तीन सिमेंट बंधारे कामांवर ९९ मजूर व इतर चार कामांवर ७२१ मजूर काम करीत आहेत. एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची असून एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर मजगीच्या कामावर कार्यरत आहेत. (नगर प्रतिनिधी)कामाची मागणी वाढली धान पीक निघाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजुराला व अल्पभूधारक शेतकऱ्याला कामासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सद्य:स्थितीत रोहयोच्या कामावर सुमारे ४६ हजार ५९३ मजूर काम करीत आहेत. जिल्हाभरात ग्रामपंचायतचे ५६२ व यंत्रणास्तरावरील ४२८ कामे सुरू आहेत. रोहयो कामांची मागणी आता तेंदूपत्ता संकलन करण्याच्या अवधीपर्यंत वाढणार आहे. १०० ग्रामपंचायतींना कामाची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३५७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. मात्र ११० ग्रामपंचायतीमध्ये अजुनही कामे सुरू झालेली नाहीत. या ग्रामपंचायतीमध्येही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.