शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावरचे छत गेले, संसारोपयोगी साहित्य नेले.. अतिक्रमणधारकांचा मुलाबाळांसह पालिकेत ठिय्या

By संजय तिपाले | Updated: June 22, 2023 11:17 IST

पोलिसांकडून अमानुष मारहाण : पाच जण जिल्हा रुग्णालयात

संजय तिपाले

गडचिरोली : शहरातील गोकुलनगरातील देवापूर रिठ सर्वे क्र. ७८ व ८८ येथील तलावातील झोपडपट्टी अतिक्रमणावर २१ जून रोजी पालिका प्रशासनाने बुलडोजर चालविला. या मोहिमेला विरोध करणाऱ्या महिला-पुरुषांसह अबालवृद्धांवर पोलिसांनी लाठी चालवली. आता डोक्यावरचे छत गेले, संसारोपयोगी साहित्यही उचलून नेले, त्यामुळे जायचे कोठे, असा प्रश्न अतिक्रमणधारकांपुढे निर्माण झाला आहे. संतप्त अतिक्रमणधारकांनी नगरपालिका आवारात ठिय्या दिला आहे. रात्री उशिरापर्यंत प्रशासनातर्फे या लोकांशी संवाद साधण्यासाठी कोणी आले नाही.

गोकुलनगरातील देवापूर रिठ येथील एकतानगरमधील झोपडपट्टी अतिक्रमण यापूर्वीच हटविण्यात आले होते, परंतु पुन्हा तिथे शंभरावर कुटुंबे झोपड्या बांधून राहू लागले. पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आव्हान दिले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. 

२१ जून रोजी पालिका प्रशासनाने जेसीबी, पोकलॅन, ट्रॅक्टर, अग्निशमन दलाचा बंब अशा साधन सामुग्रीसह तब्बल कडेकोट पोलिस बंदोबस्त घेऊन देवापूर रिठ गाठले. अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. मात्र अतिक्रमणधारक ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. संसारोपयोगी साहित्यासह अतिक्रमणधारकांना ताब्यात घेतले. हे साहित्य पोलिस मुख्यालयात नेले तर अतिक्रमणधारकांना काही वेळ ताब्यात ठेऊन सायंकाळी सोडून दिले. 

अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त

दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. झोपडपट्ट्या जमीनदोस्त करून जागोजागी खड्डे खोदण्यात आले. रात्री आठ वाजेपासून अतिक्रमणधारक नगरपालिका कार्यालयात चिल्यापिल्यांसह ठिय्या देऊन बसले आहेत. प्रशासन पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत ठिय्या सुरूच राहील, असा इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.

शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. काही ठिकाणी अतिक्रमण नियमित करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या आहेत, तर काही ठिकाणी तुकडे पाडून प्लॉटिंग केली आहे. भूमाफियांना पायघड्या टाकणाऱ्या प्रशासनाने गोरगरीब, वंचित लोकांना बेघर करण्याचे काम केले आहे. आम्ही या कुटुंबांच्या लढ्यात सहभागी आहोत.

- बाशीद शेख, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गडचिरोली.

मारहाणीतील एकाची प्रकृती गंभीर

अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करताना पोलिस व अतिक्रमणधारकांत झटापट झाली. यावेळी पोलिसांनी काहींना लाठ्यांनी मारहाण केली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दामोदर यादव नंदेश्वर (६४), मुनिफा मेहबूब मलिक ( ४०), सीता रामदास सोनूले (६५), जहिर हनिफ अन्सारी (४५), मालाताई भसुराजभजगवळी (५०) यांचा समावेश आहे. यापैकी दामोदर नंदेश्वर हे गंभीर जखमी आहेत. मारहाण झालेल्यांपैकी कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे बाशीद शेख म्हणाले.

--

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliceपोलिसGadchiroliगडचिरोली