शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

बनावट सही-शिक्क्यांसाठी बलराजने पुरवली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:00 AM

बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे. आरोपी बलराजला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांचा पीसीआर मिळाला.

ठळक मुद्देकोट्यवधीनी फसवणूक प्रकरण : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला अटक, आरोपींची संख्या झाली नऊ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या युनियन बँकेतील खात्यातून बनावट चेकने २ कोटी ८६ लाख रुपये दुसºया खात्यांमध्ये वळते करून फसवणूक करणाऱ्या आरोपींना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यानेच मदत केल्याचे समोर आले. वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत बलराज जुमनाके याला पोलिसांनी अटक केली असून त्याने कशा पद्धतीने मुख्य आरोपींना मदत केली याचा पाढा पोलिसांपुढे वाचला.बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे. आरोपी बलराजला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणती माहिती पुढे येते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.या प्रकरणातील आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी नागपूर, भंडारा आणि मध्यप्रदेशातून आरोपींना एकाच वेळी अटक झाली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींनी गडचिरोली आणि भंडारा जिल्हा परिषदेतून उडवलेल्या रकमेतून खरेदी केलेले दोन किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने जप्त केले. हे दागिने आरोपीच्या घरात आणि बँकेच्या लॉकरमध्ये होते. याशिवाय खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रेही जप्त केली आहेत.या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पो.निरीक्षक विक्रांत सगणे, उपनिरीक्षक कदम, सहायक उपनिरीक्षक दादाजी करकाडे, हवालदार नरेश सहारे व इतर कर्मचारी करीत आहेत.अन् बलराजला घेतले ताब्यातआरोपींनी रक्कम त्यांच्या बँक खात्यात स्थानांतरित करण्यासाठी वापरलेला बनावट चेक, संबंधित अधिकाºयाची सही, शिक्के हे सर्वच बनावट होते. पण ते खऱ्या चेक, सहीशी हुबेहूब मिळतेजुळते होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कोणत्यातरी कर्मचाऱ्याच्या सहभागाशिवाय आरोपींना ही माहिती मिळू शकत नाही याची खात्री पोलिसांना होती. त्यामुळे ते लेखा विभागातील संबंधित कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून होते. पोलिसांना आपला संशय खरा असल्याची खात्री पटताच त्यांनी वरिष्ठ सहायक बलराज जुमनाकेला ताब्यात घेतले. आता पोलिसांकडून काही लपवण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदfraudधोकेबाजी