बामनपेट व पलसगड येथे कार्यक्रम : कबड्डी, खो- खो, व्हॉलिबॉल, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस; गरजूंना साहित्य वितरितआष्टी/ पलसगड : पोलीस प्रशासनाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील बामनपेट तसेच कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांचे जनजागरण करण्यात आले. आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत बामनपेट येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वन परिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संदीप शिंगटे, संजू पंदिलवार, गणेश शिंगाडे, उपसरपंच रवींद्र कोवे, भांडेकर, आर. अनुतुलवार, नायब तहसीलदार बावणे, विजय बहेरवार, वैशाली कन्नाके उपस्थित होते. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ठाणेदार बेसरकर यांनी केले. वन व वन्य जीवाचे संरक्षण करून सहकार्य करावे, असे आवाहन तनपुरे यांनी केले. यावेळी धर्मराव हायस्कूल अडपल्लीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यशस्वीतेसाठी डी. डी. रॉय, संघरक्षित फुलझेले, प्रमोद उंदीरवाडे, मुनिश्वर रात्रे, मिलींद एलावार, गौरकार, गुरनुले, भसारकर, बसू यांनी सहकार्य केले. कुरखेडा तालुक्यातील पोलीस स्टेशन पुराडा अंतर्गत पलसगड येथे बुधवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन समाजकल्याण अधिकारी शिवाजी पाटील यांच्या हस्ते यावेळी अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. मडकवार होते. यावेळी पं. स. सभापती शामिना उईके, आशिष नंदनवार, शिक्षण विस्तार अधिकारी एच. आर. भैसारे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक महिपाल सिंग उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान रांगोळी, व्हॉलिबॉल, कबड्डी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोखरक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान विविध विभागाच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत गरजूंना विविध साहित्य वितरित करण्यात आले. यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक तांदळे, पोलीस उपनिरीक्षक कवडे, गुसिंगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
मेळाव्यात योजनांची माहिती व नागरिकांचे जनजागरण
By admin | Updated: December 25, 2015 02:11 IST