शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 20, 2016 02:24 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात ११२ टक्के पाऊस झाला आहे.

धान उत्पादक शेतकरी अडचणीत : कृषी विभागाचे अधिकारी बांधावर चालले; कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात ११२ टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवरील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी २९ सप्टेंबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात १५११.१ मीमी म्हणजे ११२.१ टक्का पाऊस झाला आहे. गतवर्षी केवळ ७४.२ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला होता. म्हणजे १३५४.७ मीमी पाऊस झाला होता. यंदा सतत पाऊस व तेवढ्याच प्रमाणात उकाडा असल्याने वातावरणातील बदलाचा परिणाम थेट खरीप पिकांवर होऊ लागला आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक खरीप क्षेत्र दोन लाखांच्या वर पोहोचले होते. यंदा वेळेत पाऊस आल्याने उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सप्टेंबर महिन्यात वातावरणातील बदल व अतिवृष्टीमुळे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर धानपीक असून जिल्हाभरात कृषी विभागाने १ लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यापैकी जवळजवळ ४ हजार ९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. ३ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर फवारणी १६ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. चामोर्शी तालुक्यात १०९८ हेक्टर, गडचिरोली तालुक्यात ९९५, मुलचेरा तालुक्यात ७५५, धानोरा तालुक्यात ७७२, आरमोरी तालुक्यात १५३, वडसा तालुक्यात ११२, कुरखेडा तालुक्यात १११, कोरची तालुक्यात ६३, अहेरी तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ९, एटापल्ली तालुक्यात ५ व भामरागड तालुक्यात ४ हेक्टर क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांमध्ये धान व तूर पिकाचा समावेश आहे. कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्षात शेतावर पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)