शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप, ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 12:38 IST

सिरोंचात पुराचा कहर : मेडीगड्डा धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडले

कौसर खान/ संजय गज्जलवार

सिरोंचा / जिमलगट्टा : तेलंगणातील अतिवृष्टीमुळे विसर्ग वाढल्याने गडचिरोलीत इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. नदीकाठच्या गावांना पुरांनी वेढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने रात्रभर मदतकार्य राबवून सुमारे ३३० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

तेलंगणातील कडेम धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलमपल्लीतून २५ हजार ६९३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मेडीगड्डा धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत. त्याद्वारे सुमारे ३७ हजार ८८१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत  आहे. मेडीगड्डाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी या नद्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाण्याचा ओघ वाढला. सध्या दोन्ही प्रमुख नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. नगरम, जानमपल्ली, मुगापूर चक, चिंतमपल्ली, रामकृष्णपूर, मद्दीकुंठा या गावांत प्रशासनाने बचावकार्य राबवून रात्रीतून सुमारे ३३० नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे. या लोकांना सिरोंचातील आश्रमशाळेसह इतर शासकीय इमारतींत ठेवले आहे. तेथे निवासासह जेवण व आरोग्यसुविधा पुरविण्यात येत आहेत. 

आज व उद्या शाळा बंद

दरम्यान, तालुक्यात पुराचा तडाखा बसल्याने २८  व २९ जुलै रोजी शाळा,महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर केली आहे. तालुक्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे हे सर्व विभागांशी समन्वय ठेऊन पूरग्रस्तांना मदतकार्य करत आहेत.

अहेरी तालुक्यालाही पुराचा तडाखा

जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जोगनगुडा, तिमरम, दुब्बागुडम या गावांत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली.  घरातील धान्य, जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पिके देखील पाण्याखाली गेली असून पशुधनासह स्वत:चा जीव वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. तलाठी सचिन मडावी यांनी  पूरग्रस्तांना भेट देऊन धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईचा प्रस्ताव पाठविला जाईल,असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरRainपाऊसGadchiroliगडचिरोली