पालथे झाेपा अन् रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:39 AM2021-05-06T04:39:12+5:302021-05-06T04:39:12+5:30

काेराेना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर आराेग्य विभाग उपचार करीत असताना बाधित रुग्णाची स्थिती किती प्रमाणात गंभीर आहे याकडे लक्ष ...

Increase the oxygen level in the blood | पालथे झाेपा अन् रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढवा

पालथे झाेपा अन् रक्तातील ऑक्सिजन लेव्हल वाढवा

googlenewsNext

काेराेना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर आराेग्य विभाग उपचार करीत असताना बाधित रुग्णाची स्थिती किती प्रमाणात गंभीर आहे याकडे लक्ष दिले जाते. त्यानुसार औषधाेपचार केला जाताे. याशिवाय रुग्णांना व्यायाम व अन्य उपचार पद्धतीविषयी सांगितले जाते. यानुसार आयसाेलेशनमधील रुग्णांवर उपचार केला जाताे. काेराेना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने झाले आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर अनेक बाधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जाताे.

बाॅक्स

असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन

वातावरणातील ऑक्सिजन घेणे व कार्बनडाय ऑक्साईड साेडणे हे काम फुप्फुसाचे आहे. पालथे झाेपल्याने फुप्फुसाचा व्यायाम हाेताे व त्याचे कार्य वाढते. डाव्या व उजव्या कुशीवरसुद्धा झाेपल्यास रुग्णाला फायदा हाेताे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी पालथे झाेपविणे फायद्याचे आहे. आयसाेलेशनमध्ये असलेल्या अनेक रुग्णांवर हा प्रयाेग केला जाताे. या प्रयाेगामुळे ऑक्सिजनची पातळी वाढत असल्याने ताे लाभदायकसुद्धा ठरत आहे.

बाॅक्स

ऑक्सिजन वाढण्याचे फायदे

शरीरातील प्रत्येक पेशीला रक्ताची गरज असते. ऑक्सिजन वाढल्याने चयापचय क्रिया सुरळीत हाेते. ज्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी याेग्य असते, अशा व्यक्तीचे श्वासावर नियंत्रण असते व त्याचे आयुर्मानही वाढते. तसेच इतर आजारांपासूनही संबंधित व्यक्तीचे संरक्षण हाेत. ऑक्सिजन लेेवल वाढविण्याचे अनेक फायदे आहेत.

डाॅ. विनाेद बिटपल्लीवार

वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली

बाॅक्स

...तर पालथे झाेपू नये

काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतर आयसाेलेशनमध्ये असलेल्या गराेदर महिला, पाेट किंवा छातीची शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती तसेच अतिशय गंभीर आजार असलेले रुग्ण आदींना पालथे झाेपणे अवघड हाेते. त्यामुळे अशा गंभीर आजाराच्या व्यक्तींनी पालथे झाेपू नये. त्यांच्यासाठी आराेग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकते.

डाॅ. प्रणय काेसे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज

बाॅक्स

पालथे झाेपण्याचे फायदे

पालथे झाेपल्याने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा याेग्य प्रमाणात व साेयीस्कर हाेताे. फुप्फुसावर दबाव येत नाही व ते सुरळीतपणे आपले कार्य करते. ऑक्सिजन लेवलही वाढते. त्यामुळे काेराेना बाधित व्यक्तीला श्वासाेच्छवास घेण्यास सुलभ हाेते. ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी आहे, अशांनी पालथे झाेपून हा प्रयाेग केल्यास निश्चितच त्यांना फायदा हाेईल.

डाॅ. जगदीश बाेरकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा

Web Title: Increase the oxygen level in the blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.