शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न ठप्प, कर्जाचे हप्ते भरायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. 

ठळक मुद्देवाहनात हवा भरण्यासाठीही पैसे नाहीत, कर्जावरील व्याज माफ करा

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे भाड्याने प्रवासी वाहने देण्याचा व्यवसाय जवळपास ठप्प पडला आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न वाहनमालकांसमाेर उभा ठाकला आहे.काहीतरी राेजगार असावा या उद्देशाने काही बेराेजगार युवकांनी सुमाे, स्काॅर्पिओ, झायलाे, बाेलेराे, तसेच कार वर्गातील वाहने खरेदी करून व्यवसाय सुरू केला. बहुतांशजण चालक व मालक स्वत:च आहेत. ही सर्वच वाहने ८ ते १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. अनेक वाहनांसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढण्यात आले आहे. काेराेनामुळे मागील वर्षीही लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला हाेता. पुन्हा दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे लांब प्रवासासाठी वाहन भाड्याने घेणे बंद झाले आहे. तसेच लग्न व इतर समारंभांमध्ये नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. परिणामी ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. मागील वर्षभरापासून उत्पन्न ठप्प पडले असल्याने वाहनासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरावे, असा प्रश्न या वाहनमालकांसमाेर  उपस्थित झाला आहे. शासनानेच आता कर्जावरील किमान व्याज तरी माफ करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

वाहने सुरू, पण गॅरेज बंदवाहन क्षमतेच्या निम्मे प्रवासी बसवून प्रवास करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. मात्र, गॅरेज व ऑटाेमाेबाईलची दुकाने बंद आहेत. एखादेवेळी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती करण्यास अडचण निर्माण हाेत आहेत. सामानही मिळत नसल्याने थाेडाफार जरी वाहनात बिघाड निर्माण झाल्यास ते घरीच ठेवावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने त्यांचाही राेजगार हिरावला गेला आहे.

अडचणींचा डाेंगरवाहन बंद राहिले तरी वाहनाची देखभाल व दुरुस्ती करावीच लागते. त्यामुळे वाहनाचा किमान खर्च सुरूच राहतो. हा खर्च न केल्यास वाहन बंद पडण्याची शक्यता राहते. कर्ज काढून वाहन खरेदी केले आहे. कर्जाचे हप्ते लाखाेच्या घरात आहेत. हे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दिवसातून एखादा ग्राहक मिळेल या आशेने वाहने शहरातील कार पाॅईंटवर लावली जात आहेत. मात्र, ग्राहकच मिळत नसल्याने आम्ही हतबल झालाे आहाेत. दुसऱ्या जिल्ह्यात साेडण्यासाठी ई-पास काढलेली एखादी व्यक्ती मिळते. लाॅकडाऊनमुळे वाहनांचा व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे.संदीप कांबळे, वाहन चालक-मालक

कर्ज काढून वाहन खरेदी केले. वर्षभरापासून या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या कर्जाचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या कालावधीतील स्थिती लक्षात घेता कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत वाढवून देण्याची गरज आहे.सुनील तामशेटवार, वाहन चालक-मालक

 

गॅरेजवाल्यांचे पाेट-पाणी बंद

मागील महिनाभरापासून गॅरेज बंद आहेत. दरराेज येणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा प्रपंच सुरू हाेता. मात्र, दुकानच बंद असल्याने राेजीराेटी थांबली आहे. मागील महिनाभरापासून आम्ही कसे जीवन जगत आहाेत, हे आम्हालाच माहीत.सूरज रामटेके, गॅरेज मालक

वाहन हे अत्यावश्यक वस्तू झाली आहे. मंत्री, जिल्हाधिकारी व इतर सर्वसामान्य सर्वच नागरिक संचारबंदीतही वाहनाचा वापर करीत आहेत. वाहन बिघडल्यास त्यांचे कामकाजच ठप्प पडू  शकते. गॅरेजचा  अत्यावश्यक सेवेत समावेश करून ते सुरू करू  देण्याची परवानगी आवश्यक हाेती.सुरेश मडावी, गॅरेज मजूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या