शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे कर्मचारी मागील १५ ते १९ वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । संघटनेचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन; विविध समस्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : समग्र (सर्व) शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेऊन नियमित करावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे कर्मचारी मागील १५ ते १९ वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहेत. यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी शासकीय नोकरी मिळविण्याची वयोमर्यादा ओलांडली आहे. १९ वर्षांपासून काम करीत असतानाही अजूनपर्यंत त्यांना कायम करण्यात आले नाही. अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने त्यांना न्याय दिला नाही. सेवेत कायम नसल्याने त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. शासनाने त्यांना कमी केल्यास जीवन जगणे कठीण होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे उपाध्यक्ष वकील खेळकर, अरविंद घुटके, राजेंद्र बांगरे, रामकृष्ण रहांगडाले, एच. के. शहारे, अल्का सोनीकर, वैशाली खोब्रागडे, अमोल पडोले, करूणा बागेसर, दिपाली गुडेपवार, अविनाश झिलपे आदी उपस्थित होते.शिक्षण विभागात कायम करासध्या शिक्षण विभागात अनेक रिक्त पदे आहेत. या पदांवर सर्व शिक्षा अभियानमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास शासनाला कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सदर कर्मचारी कार्यरत असल्याने शिक्षण क्षेत्रातील अनेक योजनांची या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. याचा लाभ शिक्षण क्षेत्राला होईल. तसेच मागील अनेक वर्षांपासून लढा देत असलेल्या सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. शासनावर अतिरिक्त बोजाही पडणार नाही. यापूर्वीच्या शासनाने सर्व शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. किमान विद्यमान शासनाने तरी या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.१९ वर्षांच्या सेवेनंतरही अल्प मानधनसर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी मागील १९ वर्षांपासून नियमित सेवा बजावत आहेत. १८ वर्षानंतरही त्यांना अल्प मानधन दिले जाते. या मानधनात कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मात्र दुसरा रोजगार मिळत नसल्याने नायलाजास्तव ही नोकरी करावी लागत आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNana Patoleनाना पटोले